उत्तरेत भाजपचा बंपर विजय; आनंदाच्या भरात बावनकुळेंनी फोडलं मुख्यमंत्री अन् शपथविधीचं ठिकाण

  • Written By: Published:
उत्तरेत भाजपचा बंपर विजय; आनंदाच्या भरात बावनकुळेंनी फोडलं मुख्यमंत्री अन् शपथविधीचं ठिकाण

Chandrashekhar Bawankule On Maharashtra Next CM Candidate : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून, उत्तर भारतात म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं बंपर विजय मिळवला आहे. या दणदणीत विजयानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. याच आत्मविश्वासाच्या जोरावर राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आनंदाच्याभरात महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांचं बिगूल वाजण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेईल आणि शपथविधीचं ठिकाण कोणतं असेल हे जाहीर करून टाकलं आहे. त्यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात बोलत होते.

पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड

मुख्यमंत्रीपदाचा अमेदवार अन् शपथविधीचं ठिकाण सांगितलं

2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असाही प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली. यापूर्वीदेखील बावनकुळेंच्या अनेक विधानांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यात आता त्यांनी 2024 मध्ये राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार त्याचा शपथविधी कुठे पार पडणार याबाबतची सगळी प्लॅनिंग उघड करत राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापवले आहे.

आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर बोलताना बावनकुळे यांनी 2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल असा दावा बावनकुळेंनी केला आहे. भंडाऱ्यात बोलताना बावनकुळेंनी उपस्थित कार्यकर्त्यांकडून तीन संकल्प वदवून घेतले.

‘हातात सत्ता राहिल वाटत होतं पण..,’; निवडणूक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ते म्हणाले की, राज्यात फडणवीस नावाचा एकच वाघ असून, दुसरा कुणी वाघ होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. येत्या मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून पाठवायचे असून भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून पाठवायचे आहेत त्यासाठी कामाला लागा अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या. वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावायची असल्याचेही ते म्हणाले.

फडणवीसांच्या नावामुळे शिंदे, अजितदादांचे काय?

सध्या राज्यात अधून मधून मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चांना उत येतो. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार अशा वावड्या उठतात. मात्र, आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका राज्यात शिंदेंच्या नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार असल्याचे दावा बावनकुळेंसह अन्य भाजप नेते करत आहे.

लेट्सअप स्पेशल : सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादांच्या मनात कोण? : सुनेत्रा पवार नक्कीच नाही

मात्र, दुसरीकडे याच बावनकुळेंनी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यासाठी कामाला लागण्याचा आणि त्यांच्या शपथविधी कुठे होणार आदींबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे खरचं 2024 च्या विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्त्वात लढल्या जाणार का? विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार का? आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अजित पवारांचं काय होणार असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित केले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube