गुंतवणूकदारांना दिलासा, निफ्टीने ओलांडला 25070 अंकांचा टप्पा; सेन्सेक्सची स्थिती काय?

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजाराची सुरुवात 9 ऑक्टोबर रोजी सकारात्मक झाली

Share Market Today

Share Market Today

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाजाराची सुरुवात 9 ऑक्टोबर रोजी सकारात्मक झाली असून बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात उघडले. परदेशी खरेदीच्या अपेक्षांनी आज बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. सकाळी 9:15 वाजता निफ्टी 25,074.3 वर पोहोचला, तर बीएसई सेन्सेक्स 0.15% वाढून 81,900 वर पोहोचला. या आठवड्याच्या सुरुवातीला परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी त्यांची 10 दिवसांची विक्रीची मालिका थांबवली आणि बुधवार आणि गुरुवारी निव्वळ खरेदीदार बनले.

आज निफ्टीमध्ये (Nifty) सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये टाटा स्टील, डॉ. रेड्डीज, एचसीएल टेक, जेएसडब्ल्यू स्टील आणि इंडिगो यांचा समावेश आहे. बुधवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 153.09 अंकांनी घसरून 81,773.66 वर आणि निफ्टी 62.15 अंकांनी घसरून 25,046.15 वर बंद झाला होता मात्र आज बाजाराची सुरुवात सकारात्मक झाल्याने अनेक गुंतवणूकदरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवारचा दिवस कसा होता?

बुधवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 153.09 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 81,773.66 वर बंद झाला आणि निफ्टी 50  निर्देशांक 62.15 अंकांनी म्हणजेच 0.25 टक्क्यांनी घसरून 25,046.15 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांना दिलासा, निफ्टीने ओलांडला 25070 अंकांचा टप्पा; सेन्सेक्सची स्थिती काय?

भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. बाजाराच्या सुरुवातीला दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. मात्र काही वेळातच ते पुन्हा हिरव्या रंगात परतले.

Exit mobile version