Share Market : शेअर मार्केटमध्ये (Share Market) आज मोठी घडामोड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शेवटच्या तासांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही अंशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 30.99 अंकांनी वाढ झाली असून या अंकवाढीमुळे शेअर बाजारात आज 1.08 लाख कोटींची वाढ झालीयं. आजच्या घडामोडीत सर्वाधिक तेजीत रियल्टी, ऑटो, पावर, आणि फार्मा शेअर्समध्ये पाहायला मिळाली आहे. तर बॅकींग आणि फायनान्सचे शेअर्सं गडगडले नसल्याचं दिसून आलं.
Disqualification MLA : लवाद अन् आरोपींची दोनवेळा भेट; उद्धव ठाकरेंनी भेटीचा पुरावाच दाखवला
अखेरच्या तासात बीएसई सेन्सेक्स 30.99 अंकांनी, 0.043% वाढून 71,386.21 वर बंद झाला आहे. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 31.85 अंकांच्या, 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 21,544.85 वर बंद झाला आहे. या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी 1.08 कोटी कमावले आहेत.
Devara Teaser: अखेर प्रतीक्षा संपली..! ज्युनिअर एनटीआरच्या ‘देवरा’ची पहिली झलक आली समोर
BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज वाढून 367.48 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून हे आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवारी 366.40 लाख कोटी रुपयांवर होते. अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.08 कोटी रुपयांनी वाढले असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.08 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
‘मीडियाकडून प्रतिमा चुकीची करण्याचा प्रयत्न’; शरद मोहोळ हत्येनंतर राणेंची माध्यमांनी विनंती
दरम्यान, बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.55% वाढ झाली आहे. भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा मोटर्स आणि सन फार्मा यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 1.25% ते 1.50% पर्यंत वाढले आहेत. तर उर्वरित 16 सेन्सेक्स शेअर्समध्ये घसरण होऊन बंद झाले आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे शेअर 1.03 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक वधारला. तर ITC, Nestle India, Asian Paints आणि Tech Mahindra चे शेअर्स 0.57% ते 0.90% ने घसरले आहेत.