Sugar Stocks : सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे मालामाल झाले गुंतवणूकदार; 11 टक्क्यांनी वधारले 32 शेअर्स

Sugar Stocks : सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे मालामाल झाले गुंतवणूकदार; 11 टक्क्यांनी वधारले 32 शेअर्स

Sugar Stocks : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे <strong>साखर क्षेत्राशी संबंधित (Sugar Stocks) असलेल्या शेअर्सची किंमत वाढल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होतं यामध्ये 32 साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स अकरा टक्क्यांनी वाढले. हा निर्णय म्हणजे केंद्र सरकारने आगामी 2023-24 या वर्षासाठी साखर कारखान्यांमध्ये निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली होती.

या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार होता. त्यामुळे शेअर बाजारावर देखील परिणाम दिसून आला. मात्र सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम देखील लगेचच दिसून आला.

काय होता हा निर्णय?

केंद्र सरकारने साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. याचं कारण म्हणजे यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन देखील घटले आहे. त्यामुळे जर आहे त्या उसापासून साखर कारखान्यांनी जर साखरे ऐवजी इथेनॉलची निर्मिती केली. तर साखरेची निर्मिती कमी होईल. त्यामुळे साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र यामुळे साखर कारखान्यांचं नुकसान होणार होतं. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊसाच्या उत्पन्नावर होणार होता. त्यामुळे विरोधकांनी सरकार जोरदार हल्लाबोल केला होता.

महामंडळ अन् आयोगांवरील नियुक्त्या मार्गी लावा : गोगावलेंच्या नेतृत्वात आमदारांचे CM शिंदेंकडे लॉबिंग

मात्र, आता अवघ्या चार दिवसात केंद्राने घेतलेला हा निर्णय अखेर बदलला आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना मोठा दिलास मिळाला आहे. केंद्राने ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीसाठी हिरवा कंदील दिला असून, या निर्णयामुळं 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दाऊद जिवंत अन् तंदुरुस्त, छोटा शकीलने केला मोठा दावा; सोशल मीडियावर आफवांचे पीक

कोण-कोणत्या कंपन्यांचे शेअर्स वधारले?

यामध्ये धामपूर साखर कारखान्याचे शेअर्स 8.22 टक्क्यांनी वाढून 268.45 वर पोहोचले. बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेडचे शेअर्स 9.22 टक्क्यांनी वाढून 91.38 रुपयांवर गेले. बलरामपुर चिनी मिल्स 7. 15 टक्क्यांनी वाढून 412.05 रुपयांवर गेले. द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज 6.39 टक्क्यांनी वाढवून 91.38 रुपयांवर गेले. इंडियन सर्कस लिमिटेड 9.0 टक्क्यांवर होते. ते 10.65 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे श्री रेणुका शुगरचे शेअर्स 6.86 टक्क्यांनी वाढून 49.99 रुपये, उगार शुगर वर्क्स लिमिटेड 7.98 टक्क्यांनी वाढून 86.84 रुपये, त्रिवेणी इंजीनियरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड 4.96.30 आणि मगध शुगर अँड एनर्जी लिमिटेड 6.26 टक्क्यांनी वाढून 49.75 रुपयांवर पोहचले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube