दाऊद जिवंत अन् तंदुरुस्त, छोटा शकीलने केला मोठा दावा; सोशल मीडियावर आफवांचे पीक

दाऊद जिवंत अन् तंदुरुस्त, छोटा शकीलने केला मोठा दावा; सोशल मीडियावर आफवांचे पीक

Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विषबाधा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. त्याला कराचीतील (Karachi) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता दाऊदचा हस्तक छोटा शकीलने (Chota Shakil) हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

काय म्हणाला छोटा शकील?
छोटा शकीलने दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची बातमी मूर्खपणाची म्हटले असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. दाऊदच्या वाढदिवशी अशा बातम्या अनेकदा येत असतात. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. छोटा शकील हा दाऊदचा उजवा हात मानला जातो. 1986 मध्ये तो दाऊदच्या संपर्कात आला होता. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर शकीलची दाऊदशी जवळीक वाढली होती.

Dawood Ibrahim चा खरंच मृत्यू झालाय? ‘तो’ एक स्क्रीनशॉट अन् बातम्यांमागील सत्य…

सोशल मीडियावर दावा केला जात होता आहे की दाऊदला विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले आहे. काही युझर्संनी पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वर उल हक कक्कर यांच्या आकाऊंटचे स्क्रीनशॉट देखील पोस्ट केले होते. त्यात दाऊदचा मृत्यू झाल्याचा उल्लेख होता. पण ते मेसेज आणि अकाउंट फेक निघाले आहेत.

Dawood Ibrahim : बॉम्बस्फोट, टार्गेट किलिंग अन्…; दाऊदने भारतात कोण कोणते गुन्हे केले?

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, भारताच्या मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉनला कराचीमध्ये काही अज्ञात व्यक्तीने विष प्राशन केले आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्या पाकिस्तानमध्ये गुगल आणि ट्विटरही बंद आहे.

दरम्यान, दाऊद अनेक वर्षांपासून फरार होता. दाऊदवर दरोडा, डकैती, तस्करी, खंडणी, अपहरण आणि बॉम्बस्फोट असे अनेक गुन्हे दाखल आहेत. दाऊद हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड मानला जातो. या हल्ल्यात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. पण पाकिस्तान सरकारने ते कधीच मान्य केले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube