Download App

12 लाखांच्या ‘या’ शानदार कारवर मिळत आहे 2.5 लाख रुपये वाचवण्याची संधी; जाणून घ्या ऑफर

Skoda Car Offers : तुम्ही देखील जून महिन्यात (June 2024) तुमच्यासाठी जबरदस्त मायलेज आणि सर्वत भारी फीचर्ससह येणारी कार (Car) खरेदी करण्याचा

Skoda Car Offers : तुम्ही देखील जून महिन्यात (June 2024) तुमच्यासाठी जबरदस्त मायलेज आणि सर्वत भारी फीचर्ससह येणारी कार (Car) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या बातमीनुसार, लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी स्कोडा जून 2024 (Skoda Car Offers) मध्ये तिच्या काही लोकप्रिय कार्सवर जबरदस्त ऑफर देत आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अगदी स्वस्तात एक बेस्ट कार खरेदी करू शकता.

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात स्कोडा कारवर जास्तीत जास्त 2.5 लाख रुपयांची बचत होऊ शकते. चला मग जाणून घेऊया तुम्ही या भन्नाट ऑफर अंतर्गत कोणत्या कोणत्या कार्स खरेदी करू शकतात.

Skoda Car Offers

Skoda Slavia

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी जून 2024 मध्ये सेडान सेगमेंटमध्ये लोकप्रिय कार स्लाव्हिया या कारवर 1.5 लाखांची सवलत देत आहे. याच बरोबर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांचे मेंटिनेंस पॅकेज आणि विशेष फायदे म्हणून पाच वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. भारतीय बाजारात या कारची एक्स शोरुम किंमत 11.63 लाख रुपयांपासून सुरू होते.

Skoda Kushaq

स्लाव्हियासह कंपनी लोकप्रिय एसयूव्ही कार स्कोडा कुशाकवर देखील भन्नाट ऑफर देत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना जून 2024 मध्ये या शानदार एसयूव्ही कारवर 2.5 लाख रुपये वाचवण्याची सुवर्णसंधी आहे. याच बरोबर तीन वर्षांचे मेंटिनेंस पॅकेज आणि विशेष फायदे म्हणून पाच वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे.

राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप, केली JPC चौकशीची मागणी, म्हणाले, खोटे एक्झिट पोल्स दाखवून…

भारतीय बाजारात या एसयूव्ही कारची एक्स शोरुम किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर दुसरीकडे कंपनी फुल साइज SUV Kodiaq आणि लक्झरी सेडान कार Superb वर कोणत्याही प्रकारची ऑफर देत नाही.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज