राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप, केली JPC चौकशीची मागणी, म्हणाले, खोटे एक्झिट पोल्स दाखवून…

राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप, केली JPC चौकशीची मागणी, म्हणाले, खोटे एक्झिट पोल्स दाखवून…

Rahul Gandhi On Stock Market Scam : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Results) काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर खोटे एक्झिट पोल (Exit Poll) दाखवून भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Markets) मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी म्हणाले, प्रचारादरम्यान मोदी म्हणाले होते की, 4 जून रोजी शेअर मार्कोटमध्ये मोठी वाढ होणार आहे. यानंतर हाच मेसेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून देण्यात आला त्यानंतर 1 जून रोजी मीडियानं खोटे एक्झिट पोल जाहीर केले आणि त्यामध्ये भाजपला 400 जागा मिळणार असं दाखवले मात्र भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला 220 जागा मिळणार अशी माहिती देण्यात आली होती.

तरीही देखील खोटे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आणि यानंतर 3 जून रोजी शेअर मार्केटनं विक्रमी उच्चांक गाठला होता मात्र 4 जून रोजी निकाल जाहीर होताच शेअर बाजार खाली आला आणि यामुळे गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले असं म्हणत बाजारात झालेली वाढ हा एक मोठा घोटाळा होता असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

याच बरोबर राहुल गांधी यांनी मीडिया चॅनेल्स आणि सर्व्हे कंपन्यांच्या एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केले. मीडियाने खोटे एक्झिट पोल का दाखवले, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, आम्हाला खोटे एक्झिट पोल आणि शेअर बाजाराची चौकशी हवी आहे. शेअर बाजारामुळे देशाचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

नवीन ट्विस्ट? राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘RSS मोदींना पर्याय शोधतेय’

तसेच खोटे एक्झिट पोल आणि भाजपचा काय संबंध आहे याची संसदीय समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत होते मात्र निकालात भाजपला 240 तर एनडीएला 292 जागा मिळाले आणि इंडिया आघाडीला 240 जागा मिळाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज