Smartphone Restrictions In Japan Use Mobile For 2 Hours : जगभरात स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढत्या वापरामुळे आरोग्य आणि नातेसंबंधांवर होणारे नकारात्मक परिणामही तज्ज्ञ (Smartphone Restrictions In Japan) सातत्याने अधोरेखित करत आहेत. स्क्रीन टाइम कमी करण्याच्या गरजेवर भर देत आता जपानच्या (Japan) टोयोके (Toyoke) शहरात एक महत्त्वपूर्ण नियम लागू होणार आहे.
स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या या नियमानुसार, शहरातील नागरिकांना रोज केवळ दोन तासांपुरताच स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा संगणक वापरण्याची मुभा असेल. काम आणि शाळेशी निगडित जबाबदाऱ्या वगळता हा नियम कडकपणे लागू केला जाणार आहे.
ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद मैदानावर आज मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन
ऑक्टोबरपासून नियम लागू होणार
टोयोकेचे महापौर मासामी कोकी यांनी सांगितले की, शहराची विधानसभा लवकरच या संदर्भातील मसुदा अध्यादेशावर मतदान करणार आहे. मंजुरी मिळाल्यास हा नियम ऑक्टोबरपासून लागू होईल. याआधी 2020 साली जपानमधील कागावा शहरात असाच निर्णय घेण्यात आला होता.
दंड नाही, पण मार्गदर्शनासाठी नियम
या नियमाचे उल्लंघन केल्यास कोणताही दंड किंवा शिक्षा होणार नाही. महापौरांनी स्पष्ट केले की, हा नियम केवळ लोकांना जागरूक करण्यासाठी आहे. मुख्य उद्दिष्ट म्हणजे, स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होणारे आरोग्यावरचे दुष्परिणाम टाळणे. जपानमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात आढळले की, तरुण दररोज सरासरी पाच तासांहून अधिक वेळ मोबाईल किंवा संगणकावर घालवतात. त्यामुळे झोपेच्या समस्या, मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी आणि सामाजिक नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो, असे कोकी यांचे म्हणणे आहे.
हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची पहिली प्रतिक्रिया, ‘महायुतीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती…’
मुलांसाठी विशेष अटी
या नियमानुसार,
– पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी रात्री 9 नंतर फोन वापरू नये.
– मोठ्या विद्यार्थ्यांनी रात्री 10 नंतर स्मार्टफोनचा वापर टाळावा.
– शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना दिवसभरात केवळ दोन तास स्मार्टफोन वापरण्याची परवानगी असेल.
जरी या नियमानुसार कोणतेही कायदेशीर बंधन किंवा दंडाची तरतूद नसली तरी, तो अंमलात आल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. काहीजणांना हा निर्णय आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारा वाटत असला तरी अनेकांना तो व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारा वाटतो.