हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची पहिली प्रतिक्रिया, ‘महायुतीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती…’

MLA Amol Khatal First Reaction After Attack : संगमनेरमध्ये (Sangamner) झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची (Eknath Shinde Group) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद मैदानावर आज मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन
अमोल खताळ यांची प्रतिक्रिया
गणेशोत्सव सुरू असताना एका समाज कंटकाने आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर भ्याड हल्ला केला. त्या भ्याड हल्ल्यामुळे कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे. आपल्याला जनतेने मोठ्या प्रेमाने या स्थानी पोहोचवले आहे. मोठा मानसन्मान दिला आहे. या भ्याड हल्ल्याने आपण व्यथित (Attack On Amol Khatal) होणार नाही. आपण खचणार नाही. गणपती उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. संगमनेर शहर असेल, तालुका असेल माझ्यावर प्रेम करणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, कुठल्याही प्रकारे शांतताभंग होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. पोलीस प्रशासन तपास करील. ते जर कोणाचे हस्तक असतील, तर आपल्या कायद्याच्या राज्यात कठोर कारवाई केली जाईल. पुन्हा विनंती करतो, शांत राहायचं आहे, असं आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे.
PM मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा
नेमकं काय घडलं?
संगमनेरमधील मालपाणी लॉन्स येथे आयोजित फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभाला खताळ उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडताना ते उपस्थित प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असतानाच गर्दीत बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोराची ओळख प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ अशी झाली असून, त्याला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे आमदारांचे समर्थक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले होते. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
मोठा अनर्थ टळला
हल्ला होताच आमदार खताळ यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून तत्काळ त्या व्यक्तीला आवर घातला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चौकशी सुरू करण्यात आली आहे.