संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळांवर हल्ला; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Attack on MLA Amol Khatal in Sangamner; One person in police custody: संगमनेरचे (Sangamner) शिवसेनेचे (Shivsena) आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. संगमनेरमधील एका फेस्टिवलमध्ये खताळ यांच्यावरती एका माथेफिरू कडून हल्ला करण्यात आलाय. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजतात घटनास्थळी खताळ समर्थक जमा झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये यामुळे तातडीने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
ओबीसींचं आरक्षण कुठल्याही समाजाला हस्तांतरण मान्य नाही, आंदोलन करणार; महासंघाचा इशारा
संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमदार अमोल खताळ हे मालपाणी लॉन्स या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना ते उपस्थित असलेल्या प्रेक्षकांशी हस्तांदोलन करीत असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एकाने त्यांच्यावर हात मिळवण्याच्या बहाण्याने हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखून त्यांच्या सुरक्षारक्षकाने तत्काळ हल्लेखोराचा हल्ला परतवून लावला.
‘…आणि राजकीय हौस पूर्ण झाली की जातील’, जरांगेंच्या आंदोलनावर काय म्हणाले सदावर्ते?
सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले. या घटनेने ऐन गणेशोत्सवात संगमनेरातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. तालुक्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. या घटनेनंतर शहरातील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटाही मागविण्यात आलाय.
गेल्या आठवड्यात घुलेवाडीमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थकामध्ये वाद झाला होता. त्यावरून संगमनेरमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यात आता आमदार खताळ यांच्यावर हल्ला झाल्याने संगमनेरमधील राजकीय वाद आणखी चिघळू शकतो.
काँग्रेसकडून घटनेचा जाहीर निषेध
संगमनेर शहरात आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. पोलिसांनी निपक्षपणे या घटनेची चौकशी करावी व सत्य आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन पोलिसांमार्फतच प्रसारित करण्यात यावे, अशी प्रतिक्रिया संगमनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे आणि काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांची आहे.