ओबीसींचं आरक्षण कुठल्याही समाजाला हस्तांतरण मान्य नाही, आंदोलन करणार; महासंघाचा इशारा

ओबीसींचं आरक्षण कुठल्याही समाजाला हस्तांतरण मान्य नाही, आंदोलन करणार; महासंघाचा इशारा

Babanrao Taywade : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षण चर्चेचा विषय बनला आहे. ओबीसीमधून (OBC) आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना देखील झाले आहे.

ओबीसीमधूनच आरक्षण घेणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी मागणी आता ओबीसी नेते करत आहे. यातच ओबीसी आरक्षणावरुन राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक भूमिका घेण्याची तयारी करत आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण कुठल्याही समाजाला हस्तांतरण मान्य नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाकडून घेण्यात आली आहे.

ओबीसी महासंघाकडून आज नागपूर येथे झालेल्या बैठकीत महासंघाकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहे. 30 ऑगस्टपासून नागपूरच्या संविधान चौकात महासंघाचे साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून दुसऱ्या कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये अशी ओबीसी महासंघांची मागणी आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ओबीसींच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, यासाठी आता राज्यव्यापी लढा उभारला जाणार आहे. असं राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले. याच बरोबर महासंघाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन नागपूरमधील या आंदोलनाबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जात सोडावी अन् आरक्षण घ्यावे; जरांगे पाटलांना माजी आमदार लक्ष्मण मानेंचा आव्हान

तर मुंबईकडे कधी मोर्चा वळवायचा, याचा अंतिम निर्णय नागपूरमधील साखळी उपोषण संपल्यानंतर घेण्यात येईल. मात्र, हा लढा मागे हटणार नाही असं देखील तायवाडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube