ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद मैदानावर आज मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन

Manoj Jarange Patil arrives in Mumbai : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेला लढा आता पुन्हा एकदा राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज (29 ऑगस्ट 2025) पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानावर (Azad Maidan) ठिय्या आंदोलन छेडणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या आंदोलकांनी या आंदोलनाला उपस्थिती लावली (Breaking News) आहे.
आझाद मैदान परिसरात यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तर, गर्दी लक्षात घेता शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
PM मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा
वाहतुकीत बदल – पोलिसांचा आदेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा क्रांती मोर्चा बीडहून निघून नवी मुंबईमार्गे, सायन–पनवेल हायवे आणि पांजरपोळ मार्गे आझाद मैदानात दाखल होणार आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलक पायी, मोटारसायकल, कार, टेम्पो, ट्रक आदी वाहनांनी मुंबईत पोहोचतील. त्यामुळे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
राजकीय समीकरण बदलणार; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत MIM ला साथ देणार ‘हा’ पक्ष
बंद मार्ग (29 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत)
1) वाशीवरून साऊथ बॉण्डने पांजरपोळ–फिवे दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.
2) वीर जिजाबाई भोसले मार्गावरून ट्रॉम्बे दिशेला जाणाऱ्या वाहनांना बंदी.
3) छेडानगर वरून फिवेला जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.
पर्यायी मार्ग
1) वाशीवरून येणारी वाहने मानखुर्द टी-जंक्शन ब्रीजवरून स्लीप रोडने उजवीकडे वळून वीर जिजाबाई भोसले मार्गाने आयओसी जंक्शन–छेडानगर मार्गे शहरात प्रवेश करू शकतील.
2) घाटकोपर–मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे किंवा फिवेला जाणारी वाहने छेडानगर मार्गे मुंबईत प्रवेश करतील.
3) छेडानगरवरून फिवेला जाणारी वाहने उजवे वळून अमरमहल–नेहरूनगर ब्रीज–सुमननगर जंक्शनमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून पुढे जाऊ शकतील.
आंदोलनाची पार्श्वभूमी
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा राज्य सरकारला आरक्षणाच्या प्रश्नावर धडक दिली आहे. मात्र ठोस तोडगा निघत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा थेट मुंबई गाठत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.