राजकीय समीकरण बदलणार; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत MIM ला साथ देणार ‘हा’ पक्ष

Maharashtra Politics : पुढील काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र यापूर्वी प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करत मतांची बेरीज – वजाबाकी करताना दिसत आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) या निवडणुकीसाठी जोरदार तयारी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम (MIM) देखील पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे एमआयएम या निवडणुकीत किती जागांवर बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एमआयएम खासदार चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्या आझाद समाज पक्षाशी युती करु शकतो. आझाद समाज पक्ष कांशीराम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याची घोषणा केली आहे. आझाद समाज पक्षाने गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली आहे.
पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी गौरी प्रसाद उपासक यांनी याची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की, लोकसभा खासदार चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष आझाद समाज पक्ष (कांशीराम) आगामी स्थानिक महानगरपालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याची तयारी करत आहे आणि विशेषतः हा पक्ष निवडणूक लढविण्यासाठी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष एआयएमआयएम सोबत युती करून ही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. एआयएमआयएम व्यतिरिक्त इतर अनेक प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांच्याशी युतीसाठी चर्चा सुरू आहे, असं देखील ते म्हणाले.
आमची विचारसरणी एमआयएम पक्षासारखीच
गौरी प्रसाद उपासक पुढे बोलताना म्हणाले की, हा पक्ष गरीब आणि गरजूंसाठी लढणारा पक्ष आहे. एमआयएम हा देखील तोच पक्ष आहे जो धर्मनिरपेक्ष आहे, जो केवळ आवश्यक मुद्द्यांवरच जनतेमध्ये जातो. म्हणूनच आमची विचारसरणी त्यांच्यासारखीच आहे.
Online Gaming Bill ला कायदेशीर आव्हान, ‘या’ कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
आम्ही या संदर्भात एमआयएम नेते इम्तियाज झलील यांच्याशी अनौपचारिकपणे बोलत आहोत. आमच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत हजारो मते मिळाली. आम्ही आरोग्य, शिक्षण इत्यादी मुद्दे जनतेमध्ये घेऊन जाऊ.