मोठी बातमी! एमआयएमला तिसऱ्या आघाडीत नो एंट्री, बच्चू कडूंची माहिती
Bachchu Kadu : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एमआयएमला (MIM) सोबत घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राजू शेट्टी (Raju Shetty), छत्रपती संभाजी राजे आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीत एमआयएम सामील होणार असल्याची चर्चा होती. तिसऱ्या आघाडीनेही एमआयएमला झिडकारलं. आमदार बच्चू कडू यांनी आज ही माहिती दिली.
गणेश विसर्जन होताच अजित पवार ॲक्शन मोडमध्ये, ‘देवगिरी’वर आमदारांना हजर होण्याचे आदेश
बच्चू कडू आज नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना आगामी निवडणुकीत तिसरी आघाडी सर्वात शक्तिशाली असेल असेल दावा केला. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना आमची आघाडी निवडणुकीत स्थान देईल, असं कडू म्हणाले.
एमआयएमला तिसऱ्या आघाडीत घेणार का? असा सवाल केला असता कडू म्हणाले की,
एमआयएम या पक्षाला स्थान नसेल. एमआयएम प्रामुख्याने धार्मिक ध्रुवीकरण आणि राजकारणावर लक्ष केंद्रित करतो. एमआयएम पक्षाची धार्मिकता आम्हाला पचवता येण्यासारखी नाही. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला. आमचा लढा जात आणि धर्मापलीकडे आहे. धार्मिकता किंवा धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षांपासून तिसरी आघाडी अंतर ठेवून आहे, असं कडू म्हणाले.
Beed Politics : मुंडे बंधू भगिणींवर आरोप, आमदार लक्ष्मण पवार यांची विधानसभेतून माघार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीच अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस सगळे सुत्रे हलवत आहेत, असा आरोप जरांगे पाटलांनी केला. त्याविषयी विचारलं असता कडू म्हणाले की, असं काही चित्र नाही. एकनाथ शिंदे एवढे कमजोर नहाीत. मुख्यमंत्री म्हणून काही पॉवर असतात. ते एवढे कमजोर नाहीत, हे त्यांना लोकसभेला दाखवून दिलंय, असं कडू म्हणाले.
बच्चू कडूंनी जाहीर केली उमेदवारी…
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निफाडमध्ये शेतकरी मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी भाजपचे ओबीसी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुरुदेव कांदे यांनी प्रहार जनशक्तीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी निफाड विधानसभा मतदारसंघात गुरुदेव कांदे आणि चांदवड विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली.