Download App

तुमचा स्मार्टफोन किती फास्ट अन् पॉवरफुल? मिनिटांत मिळेल उत्तर; जाणून घ्या Step-by-Step

तुमचा स्मार्टफोन किती पॉवरफुल आहे याची तरी तुम्हाला माहिती आहे का.. नाही ना.. चला तर मग आज याच खास गोष्टी जाणून घेऊ या..

Smartphone Performance : स्मार्टफोन आणि इंटरनेट आज परवलीचे शब्द झाले आहेत. या दोन गोष्टींशिवाय काही काम होईल अशी परिस्थितीच आज नाही. कोणतेही काम असो या दोन गोष्टींमुळे अगदी काही मिनिटात होते. हातात स्मार्टफोन असला की मोठ्यातले मोठे काम अगदी चुटकीसरशी होते. कामाला स्पीडसुद्धा असतोच की.. पण यासाठी अट एकच तुमचा फोन तितकाच स्मार्ट अन् फास्ट असला पाहिजे. फोन फास्ट असला तरी अनेकदा स्लो होतो हँगही होतो. त्यामुळे मनस्ताप होतो. ही समस्या अनेकांना येत असते. पण ही समस्या का निर्माण होते? याचा कधी विचार केला आहे का? तुमचा स्मार्टफोन किती पॉवरफुल आहे याची तरी तुम्हाला माहिती आहे का.. नाही ना.. चला तर मग आज याच खास गोष्टी जाणून घेऊ या..

खरंतर यासाठी दोन अगदी सोपे पर्याय उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेटिंगच्या माध्यमातून या गोष्टीची माहिती तुम्ही घेऊ शकता. यासाठी सर्वात आधी सेटिंग्जमध्ये जा. नंतर बॅटरी आणि डिव्हाईस केअरमध्ये जा. येथून तुम्ही फोन मेमरी आणि परफॉर्मन्स चेक करू शकता. तसेच AnTuTu ॲपच्या माध्यमातून तुमचा स्मार्टफोन किती पॉवरफुल आहे याची माहिती घेऊ शकता. आता स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सची माहिती घेऊ या..

सेकंड हँड कार खरेदी करताय? मग ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाच, नाहीतर होईल फसवणूक..

आजमितीस अनेक स्मार्टफोनमध्ये बॅटरी आणि डिव्हाईस केअर हा स्वतंत्र पर्याय असतो. या माध्यमातून फोन मेमरी आणि परफॉर्मन्स या गोष्टींची माहिती मिळवू शकता. तसेच कोणते अँप किंवा सेटिंग फोनसाठी अडचणीचे ठरत आहे याची माहिती देखील तुम्ही इथेच मिळवू शकता.

RAM चा वापर

फोनमधील RAM च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनमधील RAM चा किती प्रमाणात वापर होत आहे याची माहिती मिळू शकते. इतकेच नाही तर काही फोनमध्ये RAM क्लिअर करण्याची सुविधा सुद्धा मिळते. यामुळे फोनचा परफॉर्मन्स वेगवान होण्यास मदत मिळते.

बेंचमार्किंग मोबाईल ॲपचा वापर

बेंचमार्किंग अँपचा वापर करून तुम्ही काही मिनिटातच समजू शकता की तुमचा स्मार्टफोन किती पॉवरफुल आहे. या अँपच्या मदतीने फोनमधील CPU, GPU आणि RAM यांच्यासह अन्य गोष्टींची माहिती मिळते. यानंतर स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सच्या आधारे काही स्कोअर दिला जातो. या स्कोअरचा वापर करून तुम्ही तुमचा फोन दुसऱ्या एखाद्या फोनपेक्षा किती पॉवरफुल आहे याची तुलना करू शकता. या व्यतिरिक्त आज प्ले स्टोअरवर असे अनेक अँप उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनचा परफॉर्मन्स सहज चेक करू शकता.

ऑफीसमध्ये जा, आराम करा अन् लाखो रुपये पगार मिळवा.. ‘या’ कंपनीतील जॉबही खास

follow us