सेकंड हँड कार खरेदी करताय? मग ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाच, नाहीतर होईल फसवणूक..

सेकंड हँड कार खरेदी करताय? मग ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवाच, नाहीतर होईल फसवणूक..

Second Hand Car Buying Tips : भारतात सेकंड हँड वाहनांचा बाजार वाढत चालला आहे. बहुतांश लोक असे आहेत जे नवीन कार खरेदी करण्याऐवजी जुनी कार खरेदी करणे (Second Hand Car) पसंत करतात. सेकंड हँड कार खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. पण जर अशी कार खरेदी करताना सावधानता बाळगली नाही तर तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते. अनेकदा अशा व्यवहारांत फसवणूक होते. त्यामुळे जर तुम्हाला सेकंड हँड कार खरेदी करायचीच असेल तर काही महत्वाच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच.

वाहनाची पूर्ण चौकशी करा

सेकंड हँड कार खरेदी करण्याआधी या वाहनाची सर्व माहिती घ्या. कारचे इंजिन, टायर, ब्रेक, सस्पेंशन आणि बॉडी तपासून घ्या. जर तुम्हाला वाहनाबाबत जास्त माहिती नसेल तर अशा वेळी तुम्ही एखादा विश्वासू मेकॅनिक सोबत घेऊन जाऊ शकता. कार खरेदी करण्याआधी एक टेस्ट ड्राइव्ह (Test Drive) जरूर घ्या. जेणेकरून कारची स्थिती कशी आहे याचा अंदाज तुम्हाला येईल.

कागदपत्रांची सत्यता तपासून घ्या

सेकंड हँड कार खरेदी करण्याआधी या वाहनाची सर्व कागदपत्रे बारकाईने चेक करा. कारचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), इन्शुरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट आणि सर्विस हिस्ट्री नक्की चेक करा. कारच्या RC वरून तुम्हाला कारचा मूळ मालक कोण आहे याची माहिती मिळेल. कारवर एखादे कर्ज आहे का हे सुद्धा चेक करा. कागदपत्रात जर काही गडबड दिसत असेल तर काहीतरी फसवणूक होत आहे हे समजून जा. कारच्या नंबर प्लेट बरोबरच VIN नंबर चेक करून तुम्ही सगळी हिस्ट्री तपासू शकता.

Fact Check : रेल्वेच्या तत्काळ तिकिट नियमांत खरचं बदल झालाय का?; IRCTC ने स्पष्ट केलं

वाहनाच्या योग्य दराची माहिती घ्या

सेकंड हँड कारची किंमत त्या कारचे वय, कंडीशन, मॉडेल आणि मार्केट डिमांड यावर अवलंबून असते. बऱ्याच वेळेस विक्रेता जास्त पैशांची मागणी करतो. अशा वेळी तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून वाहनाच्या किंमतीची माहिती घेऊ शकता. तसेच गाडीच्या कंडिशनच्या हिशोबाने दर ठरवा. जर किंमत खूप कमी असेल तर सावध व्हा कारण अशा वेळी वाहनातील खराबी लपविण्याचा प्रयत्न असू शकतो.

वाहनाची हिस्ट्री चेक करा

सेकंड हँड कारची हिस्ट्री माहिती करून घेणे जास्त महत्वाचे आहे. कार खरेदी करण्याआधी कार किती जणांकडे होती? कारचा कधी अपघात झाला होता का? किंवा एखाद्या नैसर्गिक संकटात कारचे काही नुकसान झाले होते का? याचीही माहिती घेऊन ठेवा. कारच्या सर्विस रेकॉर्डवर एक नजर टाका. यावरून कारची देखभाल कशी केली होती याची माहिती तुम्हाला मिळेल.

विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच कार खरेदी करा

कार खरेदी करण्यासाठी नेहमी विश्वासार्ह विक्रेत्याचीच निवड करा. आपल्या ओळखीतील, रजिस्टर्ड डीलर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कार खरेदी करू शकता. अनोळखी लोकांकडून कार खरेदी करू नका. सेकंड हँड कार खरेदी करण्याआधी डीलरकडून सर्व्हिस पॅकेज आणि वॉरंटी बाबत माहिती विचारा.

काय सांगता! कमी प्रीमियम मध्येही मिळेल हेल्थ इन्शुरन्स; ‘या’ सोप्या ट्रिक्स ट्राय कराच..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube