शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा धक्का; 6 लाख कोटींचे नुकसान; जाणून घ्या 5 कारणे

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 1 हजार पेक्षा

Stock Market Crash

Stock Market Crash

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 1 हजार पेक्षा जास्त अंकांनी तर निफ्टी 300 पेक्षा जास्त अंकांनी घसरत व्यवहार करत असल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सध्या निफ्टी  22,900 च्या पातळीच्या खाली व्यवहार आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार घसरणीचे नेमकं कारण काय? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.

इराण-अमेरिका संघर्ष

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका (Iran-US Conflict) यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षाचा देखील परिणाम भारतीय शेअर बाजारात होताना दिसत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या बाबत असणाऱ्या अनिश्चितामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची योजना आखली आहे.

कच्च्या तेलाचे दर

इराण-अमेरिका यांच्यात सुरु असणाऱ्या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर देखील वाढत आहे. सध्या ‘ब्रेंट क्रूड’ची (Brent Crude) किंमत जवळपास 2 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 107 डॉलर्सच्या आसपास पोहोचली आहे.  तर ‘डब्ल्यूटीआय क्रूड’ (WTI Crude) प्रति बॅरल सुमारे 94 डॉलर्सवर व्यवहार करत होते.

बॉण्ड यील्डमधील (Bond Yields) वाढ

अमेरिकेतील बॉण्ड यील्डमध्ये (रोख्यांवरील परताव्याच्या दरात) होत असलेल्या वाढीमुळेही बाजारावर दबाव (Stock Market Crash) आहे. 10-वर्षांच्या ट्रेझरी बॉण्डचा परतावा दर (yield) 5.2 टक्क्यांच्या वर गेला आहे, जी 2004 नंतरची सर्वोच्च पातळी आहे. बॉण्ड यील्ड वाढल्यामुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बॉण्ड्समधील गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरते, ज्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढतो.

रुपयात मोठी घसरण

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 14 पैशांनी कमकुवत होऊन 95.89 प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला. तर पुढील काही व्यवहारात रुपया 96 प्रति डॉलरपर्यंत पोहोचू शकतो अशी भीती आता गुंतवणूकदारांना असल्याने याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे.

स्मृती इराणी पुन्हा मंत्री होणार? उत्तर प्रदेशातून राज्यसभेची निवडणूक लढण्याची शक्यता

परदेशी गुंतवणूकदार 

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत होत असल्याने अनेक परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून आपला पैसा काढून घेत आहेत. माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्टमध्ये शेअर्सची खरेदी केल्यानंतर, सप्टेंबरमध्ये ‘फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स’ (FPIs) निव्वळ विक्रेते (net sellers) बनले आहेत. ज्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारात होत आहे.

Exit mobile version