Video : ‘महाराष्ट्राची ओळख मुंबई अन् फडणवीसांमुळे’ अमेरिकन राजदूतही फडणवीसांचा जबरा फॅन

Sergio Gor On Devendra Fadnavis तुमच्याकडे एक असा माणूस आहे, जो डायनॅमिक आहे, प्रचंड ऊर्जा असलेला आहे आणि ज्याला आपल्या कामाबद्दल आस्था आहे.

  • Ninad K
  • Written By: Published:
Sergio Gor On Devendra Fadnavis

Sergio Gor On Devendra Fadnavis  “आजघडीला महाराष्ट्र जगाच्या नकाशावर दोन गोष्टींमुळे आहे. एक म्हणजे मुंबई आणि दुसरे म्हणजे तुमचे विलक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,” असे गौरवोद्गार अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी जाहीरपणे कौतुक करत व्यक्त केले आहेत. ते मुंबईतील ‘मेडिसिटी’ प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार आणि अमेरिकेतील प्रसिद्ध क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात सामंजस्य करार झाला त्यावेळी बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर उपस्थित होते.

‘तुमच्याकडे डायनॅमिक आणि प्रचंड ऊर्जा असलेला नेता’

या कार्यक्रमात बोलताना सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “मला ज्यांना पाहून आनंद होत आहे, ते माझे मित्र आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मी जगभर फिरलो आहे आणि अनेक नेत्यांना भेटलो आहे. तुमच्याकडे एक असा माणूस आहे, जो डायनॅमिक आहे, प्रचंड ऊर्जा असलेला आहे आणि ज्याला आपल्या कामाबद्दल आस्था आहे,” असे गोर म्हणाले. यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या जागतिक ओळखीचा उल्लेख करत फडणवीस यांचे आणखी कौतुक केले. “आजघडीला महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर आहे. एक म्हणजे मुंबई आणि दुसरे म्हणजे तुमचे विलक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. गोर यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.

गोर यांच्या कौतुकानंतर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण

सर्जिओ गोर यांनी फडणवीस यांचे केलेले हे जाहीर कौतुक महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विशेष म्हणजे, एखाद्या अनिवासी भारतीय, उद्योगपती किंवा राजकीय नेत्याने केलेले हे कौतुक नसून भारतात अमेरिकेचे अधिकृत प्रतिनिधित्व करणाऱ्या राजदूतांनी केलेले वक्तव्य असल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. अमेरिकेच्या राजदूतांकडून सार्वजनिक व्यासपीठावर झालेल्या फडणवीस यांच्या कौतुकामुळे या चर्चेला आणखी एक वेगळा आयाम मिळाला आहे. भारतात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजदूत पदावरील व्यक्तीने एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांचे कौतुक करणे ही बाब उल्लेखनीय मानली जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चांगल्या कामगिरीच दखल फक्त महाराष्ट्र आणि भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घेतली जात असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

follow us