Supreme Court Recruitment 2025: नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court ) नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने (SCI) ज्युनियर कोर्ट असिस्टंट (Junior Court Assistant) पदासाठी भरती जाहीर केली आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची नेमकी काय प्रक्रिया आहे? तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या.
ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी www.sci.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ५ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२५ आहे.
पात्रता –
सर्वोच्च न्यायालयात ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांचा संगणकावर इंग्रजी टायपिंगचा स्पीड ३५ शब्द प्रति मिनिट असावा.
वयोमर्यादा–
सर्वोच्च न्यायालयाच्या या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
पगार-
ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५,४०० रुपये बेसिक वेतन मिळेल. वेतन भत्ते आणि इतर अलाउन्सेस मिळाल्यावर एकूण पगार दरमहा ७२,०४० रुपये होऊ शकतो.
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, टायपिंग चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसह आवश्यक टप्प्यांमधून केली जाईल.
अर्ज शुल्क-
सर्वोच्च न्यायालयाच्या भरतीसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर एससी/एसटी/पीएच उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
साता समुद्रापार मराठी ‘संस्कृती’चा डंका, यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये ‘करेज’चं विशेष कौतुक
परीक्षेची पद्धत-
सर्वोच्च न्यायालयातील ज्युनियर कोर्ट असिस्टंटच्या लेखी परीक्षेत १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी २ तासांचा असेल. या परीक्षेत जनरल इंग्रजी, जनरल नॉलेज आणि जनरल अॅप्टिट्यूड विषयावर प्रश्न विचारले जातील. त्याचप्रमाणे, २५ प्रश्न संगणक ज्ञानावर आधारित असतील.
इंग्रजी टायपिंग टेस्टही १० मिनिटांची स्वतंत्र परीक्षा असेल.
अधिसूचना –https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3ec0490f1f4972d133619a60c30f3559e/uploads/2025/02/2025020434.pdf
गुजरात उच्च न्यायालयातही बंपर भरती…
गुजरात उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीश पदांच्या २१२ जागांसाठी भरती सुरू झाली. या भरतीसाठी gujarathighcourt.nic.in या वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे. दिवाणी न्यायाधीश पदासाठी अर्ज प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. या पदासाठी १ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७७,८४० रुपये ते १,३६,५२० रुपये पगार मिळेल.