साता समुद्रापार मराठी ‘संस्कृती’चा डंका, यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये ‘करेज’चं विशेष कौतुक

साता समुद्रापार मराठी ‘संस्कृती’चा डंका,  यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये ‘करेज’चं विशेष कौतुक

Sanskruti Balgudes Courage creening at Santo Domenigo USA Film Festival : काही दिवसांपूर्वी संस्कृतीच्या (Sanskruti Balgude) पहिल्या-वहिल्या इंग्रजी चित्रपट ‘करेज’चं (Courage Movie) सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवलमध्ये स्क्रिनिंग पार पडलं. या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहित केलं. संस्कृती उत्तम कलाकार आहे, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. तिच्या अभिनयाची भुरळ अगदी साता समुद्रापार पार प्रेक्षकांना (Santo Domenigo USA Film Festival) पडली आहे, तिच्या कामाचं कौतुक देखील झालं.

मोठी बातमी : घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे दोषी; करूणा शर्मांना द्यावी लागणार दोन लाख पोटगी

विशेष म्हणजे संस्कृती ही पहिली मराठी अभिनेत्री आहे, जिने सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये भारताच प्रतिनिधित्व केलं आहे. म्हणून हा फिल्म फेस्टीवल संस्कृतीसाठी अगदीच खास आहे. संस्कृतीच्या करेज इंग्रजी चित्रपटाचं (Entertainment News) सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये विशेष कौतुक झालंय. सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी संस्कृती बालगुडे पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे.

“आज नाही पण, उद्याची खात्री नाही”, भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा खोचक टोला

संस्कृतीचा या फिल्म फेस्टीवल बद्दलचा अनुभव सोशल मीडियावर शेयर करताना संस्कृती म्हणाली की, करेजला तुम्ही खूप प्रेम दिलं. हसऱ्या चेहऱ्याने आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू आणून हा चित्रपट तुम्ही खास केलात. यासाठी मी कायम ऋणी राहणार आहे. हे जे काही घडलं ते खूप सुंदर आणि अनपेक्षित आहे, म्हणून याचा आनंद आहे. तुम्हाला आमची कलाकृती आवडली, तुम्ही ती आपलीशी केली. आभार मानावे तितके कमीच आहेत. पण हा समृद्ध संपन्न करणारा अनुभव खूप कमालीचा होता.

संस्कृती तिच्या अभिनयाची जादू आजवर सगळ्यांनी अनुभवली आहे, पण तिच्या या इंग्रजी चित्रपटाने पून्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं केलं. जगभरात संस्कृतीच्या “करेज” या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे, पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे हे बघणं देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube