Download App

Health Update : ग्रीन टी घेताय? ‘या’ गोष्टींची काळजी घ्या अन्यथा होतील वाईट परिणाम

Green Tea : आजकाल प्रत्येक जण शरीराच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. तर अनेक जणांना पोटाच्या वाढत्या चरबीची चिंता सतावते. तासन् तास जिममध्ये घाम गाळून आहे पोट कमी होण्याचे नाव घेत नाही. याच लठ्ठपणामुळे अनेक आजार आपला पाठलाग करतात. यावर उपाय म्हणून अनेक जण विविध उपाय करतात. त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी घेण्यास प्राधन्य दिले जाते. मात्र ग्रीन टी घेताना देखील काही गोष्टींची काळजी घ्या नाही तर वजन कमी करण्याचा उपायच तुमच्यासाठी अपायकारक ठरू शकते. ( Take care of these things neither harmful while taking Green tea )

शरद पवारांची ‘ती’ मुत्सद्देगिरी ते ठाकरेंचं बंद दार; देवेंद्र फडणवीसांनी सगळंचं बाहेर काढलं…

काय आहेत ग्रीन टीचे फायदे?

ग्रीन टी प्यायल्याने इम्युनिटी सुधारते. ग्रीन टी हा कर्करोग, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि ह्रदयरोगावर फायदेशीर मानले जाते. त्यामुळे ग्रीन टी पिण्याचे प्रमाण आणि वेळ व्यवस्थित असल्यास त्याचे तुम्हाला भरपूर फायदे होऊ शकतात. मात्र ग्रीन टी घेताना देखील काही गोष्टींची काळजी घ्या नाही तर वजन कमी करण्याचा उपायच तुमच्यासाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे ग्रीन टी घेताना कोणता काळजी घ्यावी पाहुयात…

ग्रीन टी पिताना ही काळजी घ्या :

सकाळी अनाशेपोटी ग्रीन टी पिऊ नका. कारण यामुळे शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढते. त्यामुळे सकाळी अनाशेपोटी ग्रीन टी घेण्याऐवजी त्यापूर्वी काही तरी हेल्दी खावं त्यानंतर ग्रीन टी प्यावा. त्याचबरोबर ग्रीन टी जास्त प्रमाणात घेतल्याने तणाव, निद्रानाश, पचनासंबंधी समस्या निर्माण होतात. त्यामुळे दिवसभरात केवळ दोन किंवा तीन कप ग्रीन टी प्या.

नेमकं चुकलं कोण? शरद पवार की फडणवीस? भाजप नेत्यानं वीकिपीडियाचाच दिला पुरावा

त्याचबरोबर ग्रीन टीमध्ये कॅफिन असल्याने रात्री ग्रीन टीचे सेवन करू नये. तसेच जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने अन्नातून पोषक तत्त्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे जेवणानंतर 1-2 तासांनी ग्रीन टी प्या. तसेच काही औषधांच्या सेवनानंतर लगेचच ग्रीन टी प्यायल्यास त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच ग्रीन टीच्या बॅगचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळा.

Tags

follow us