शरद पवारांची ‘ती’ मुत्सद्देगिरी ते ठाकरेंचं बंद दार; देवेंद्र फडणवीसांनी सगळंचं बाहेर काढलं…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची दार बंद करुन काम करण्याची पद्धत या सर्व गोष्टी बाहेर काढत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विरोधकांना चांगलचं धारेवर धरलं आहे. जळगावमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
नेमकं चुकलं कोण? शरद पवार की फडणवीस? भाजप नेत्यानं वीकिपीडियाचाच दिला पुरावा
फडणवीसांनी आपल्या भाषणातून विकासकामांचा पाढा वाचता-वाचता थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बरसले आहेत. आम्ही फेसबुक लाईव्ह नाहीतर जनतेमध्ये उतरुन काम करीत आहोत. बंददाराआड आमचं काम नाही तर उघडपणे काम करीत असल्यानेच आमच्या सभांना मोठी गर्दी होत असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मला बॅनरबाजीचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, बॅनरबाजीवर आठवलेंनी विरोधकांना डिवचलं…
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंवर फडणवीसांनी थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आम्ही जनतेत उतरुन चांगलं काम करीत आहोत म्हणूनच काही लोकांना मळमळ, जळजळ, करपट ढेकरं येत असल्याची जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
Nitesh Rane : केसीआर भाजपची नाही, तर संजय राऊतच राष्ट्रवादीची ‘ढ टीम’; नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा
उद्धव ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी 1978 साली घेतलेल्या भूमिकेवर बोट ठेवत सवाल उपस्थित केले आहेत. शरद पवार वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये मंत्री असतानाही त्यांनी काँग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजपसोबत युती केली होती. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मुत्सद्देगिरी म्हटले होते.
बारामतीकरांना कुणाची भाषा समजली? ‘त्या’ विधानाची आठवण करुन देत पवारांना शिंदेंचा चिमटा
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला काय म्हणता, बेईमानी? आम्ही शरद पवारांना बेईमानी म्हटलं नव्हतं, त्याला तुम्ही पवारांची मुत्सद्देगिरी म्हटलं होतं. जे लोकं याला बेईमानी म्हणतात त्यांच्यापेक्षा गद्दार दुसरं कोणी नसल्याचं म्हणत त्यांनी शरद पवारांवरही हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये भाजप-शिवसेनेच्यावतीने जाहीर सभेच्या माध्यमातून विरोधकांवर टीकेचे सत्र सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरें यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते नेमकं काय प्रतुत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.