Tata च्या इलेक्ट्रिक कार्स स्वस्त; मिळतोय 2.15 लाखांपर्यंत डिस्काउंट

Punch.ev Discounts : देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या काही लोकप्रिय कार्सवर भन्नाट डिस्काउंट

Punch.ev Discounts

Punch.ev Discounts

Punch.ev Discounts : देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या काही लोकप्रिय कार्सवर भन्नाट डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. टाटा Punch.ev, Tiago.ev, Curvv.ev, Nexon.ev आणि Harrier.ev या मॉडेल्सवर एकूण 2.15 लाखांपर्यंत बचत करण्याची संधी देत आहे.

Punch.ev ऑफर

कंपनी Tata Punch.ev च्या जुन्या मॉडेल्सवर सर्वात जास्त सवलत देत आहे. ‘लॉन्ग रेंज’ व्हेरिएंटवर, ग्राहक 1.1 लाखांपर्यंतची रोख सवलत (कॅश डिस्काउंट), 55,000 चा स्क्रॅपेज बोनस आणि 50,000 चा लॉयल्टी बोनस मिळवू शकतात अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या मॉडेलची किंमत 9.99 लाख ते 14.44 लाख दरम्यान आहे.
.
Tiago.ev ऑफर

टाटा पंचसह कंपनी Tiago.ev वरही जबरदस्त ऑफर देत आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 7.99 लाख ते 11.14 लाख दरम्यान आहे. कंपनी XZ+ ‘लॉन्ग रेंज’ व्हेरिएंटवर, ग्राहकांना 1.3 लाखांपर्यंतची रोख सवलत, 35,000 चा स्क्रॅपेज बोनस आणि 50,000 चा लॉयल्टी बोनस दिला जात आहे. दरम्यान, XT ट्रिमवर, खरेदीदार 70,000 ची रोख सवलत आणि 25,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळवू शकतात.

Nexon.ev ऑफर

देशातील सर्वाधिक खप असलेल्या इलेक्ट्रिक SUV पैकी एक असलेली Tata Nexon.ev देखील या महिन्यात 1.25 लाखांपर्यंतच्या लाभांसह उपलब्ध आहे. 2024 आणि 2025 च्या मॉडेल्सवर, कंपनी 20,000 पर्यंतची रोख सवलत, 55,000 चा स्क्रॅपेज बोनस आणि 35,000 चा लॉयल्टी बोनस देत आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 12.49 लाखांपासून सुरू होते.

Curvv.ev ऑफर

मे महिन्यात Tata Curvv.ev 1.75 लाखांपर्यंतच्या ऑफरसह खरेदी करता येणार आहे. 2024 आणि 2025 मॉडेल वर्षाच्या वाहनांवर, कंपनी 70,000 पर्यंतची रोख सवलत (कॅश डिस्काउंट), 55,000 चा स्क्रॅपेज बोनस आणि 50,000 चा लॉयल्टी बोनस देत आहे.

22 आमदार घेऊन सुनील तटकरे अन् प्रफुल्ल पटेल भाजपात जाणार? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

MY2026 (मॉडेल वर्ष 2026) च्या कार्सवर ऑफर्स बऱ्याच अंशी सारख्याच आहेत मात्र, त्यावरील स्क्रॅपेज बोनस थोडा कमी करून 35,000 करण्यात आला आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 16.99 लाख ते 22.24 लाख दरम्यान आहे.

Exit mobile version