22 आमदार घेऊन सुनील तटकरे अन् प्रफुल्ल पटेल भाजपात जाणार? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ
Rohit Pawar On Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदार घेऊन भाजपमधून लढणार असल्याचा
Rohit Pawar On Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदार घेऊन भाजपमधून लढणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. रोहित पवार यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीवर बोलताना रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल असा टोला देखील लावला आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे भाजपमधुनच (BJP) लढणार आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहे असं माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती अशी माहिती सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एक्सवर दिली आहे.
त्यांनी एक्सवर लिहिले की, काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु मधल्या काळात वेळ जुळून येत नसल्याने ही भेट अखेरीस काल झाली. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तसा कुठला उद्देशही या भेटीचा नव्हता.
गेली सहा दशके साहेब देशाच्या राजकारणात महत्वाचे योगदान देत आहेत. मी दीर्घकाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भेट देणे, तब्येतीची विचारपूस करणे हा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडच्या समृद्ध राजकीय परंपरेचा भाग आहे. या परंपरेला अनुसरूनच ही भेट झाली. साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांची काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आजही कायम आहे असं सुनील तटकरे यांनी एक्सवर म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई?
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे यांना महासचिव आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरुन काढले असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जोराने सुरु आहे. पण सुनेत्रा पवार यांनी टायपो मिस्टेकमुळे हा गोंधळ उडाला असल्याची माहिती एक्सवर दिली होती.
काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) May 13, 2026
ग्राहकांना धक्का! सोनं 11 हजार तर चांदी प्रतिकिलो 30 हजाराने वाढली; नेमकं कारण काय?
परंतु मार्च महिन्यात देखील निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या पत्रात देखील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांपुढे काहीच न लिहिल्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र या प्रकरणावर अजूनही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.