Download App

उन्हाळ्यात एसी चालू करताय? मग ‘या’ खास गोष्टी लक्षात ठेवा; राहताल टेन्शन फ्री!

उन्हाळ्याच्या दिवसांत एसी चालू करण्याआधी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या कोणत्या टिप्स आहेत याची माहिती घेऊ

AC in Summer Season : मार्च महिना सुरू झाला आहे. कडाक्याचा उन्हाळा (Summer Season)जाणवू लागला आहे. घरोघर पंखे, कुलर अन् एसी गार हवा सोडू लागले आहेत. आता एसी जोरात सुरू असला तरी थंडीच्या दिवसांत बंदच असतो. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसांत एसी चालू करण्याआधी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या कोणत्या टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहीजेत याची माहिती घेऊ या..

एअर फिल्टर चेक करा

एसीचे एअर फिल्टर हवेच्या प्रवाहाला रोखण्याचे काम करतात. यामुळे एफिशियन्सी कमी होते आणि उर्जेचा वापर वाढतो. त्यामुळे आधी फिल्टर चेक करा आणि खराब झालेले असेल तर स्वच्छ करून घ्या. यामुळे हवेचे सर्कुलेशन व्यवस्थित राहील.

आउटडोर युनिट (कंडेंसर) तपासा

बाहेरील धूळ, कचरा, झाडांचा पाला आउटडोर युनिटजवळ जमा होतो. यामुळे हवेच्या प्रवाहात अडथळे येतात. अशा वेळी एसी चालू करण्याआधईी कंडेंसर कॉइल्स साफ करुन घ्या. युनिटच्या आसपास काही अडथळे राहणार नाहीत याची काळजी घ्या.

रेफ्रिजरेंट लीक चेक कराच

रेफ्रिजरेंटची पातळी कमी झाल्याने एसीची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तसेच वीजबिलात वाढ होऊ शकते. जर तुम्हाला एसीच्या कुलिंग परफॉर्मन्समध्ये कमतरता वाटत असेल तर एसी रिपेअर करणाऱ्या कारागीराकडून रेफ्रिजरेंट रिफील करून घ्या.

आला उन्हाळा प्रकृती सांभाळा! उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी खा हे सुपरफुड!

थर्मोस्टेटही चेक करून घ्या

थर्मोस्टेट एकदा चेक करून घ्या. हा व्यवस्थित काम करत आहे की नाही याची माहिती घ्या. जर थर्मोस्टेट जुना झाला असेल तर चांगल्या एनर्जी एफिशियन्सीसाठी प्रोग्रामेबल किंवा स्मार्ट थर्मोस्टेट मध्ये अपग्रेड करण्याचा विचार करा.

एअर डक्टसची तपासणी करा

डक्टसमध्ये धूळ आणि कचरा जमा होऊ शकतो. यामुळे एसीची एअर क्वालिटी आणि कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास या उपकरणांची योग्य पद्धतीने साफसफाई करून घ्या. जेणेकरून हवेच्या प्रवाहात कोणतीही अडचण येणार नाही.

इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्टस अन् वायरिंग चेक करा

एसीच्या खराब वायरिंगमुळे एसी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे एसीच्या इलेक्ट्रॉनिक कनेक्शनची व्यवस्थित तपासणी करून घ्या. यासाठी एसी दुरुस्त करणाऱ्या टेक्निशियनची मदत घ्या. घरीच एसी चेक करण्याच्या भानगडीत पडू नका.

उन्हाळ्यात त्वचाच नाही तर केसांचं आरोग्यही येतं धोक्यात; केसांची निगा राखण्याच्या टिप्स जाणून घ्या 

follow us