Download App

Police Bharti 2024 : ठाणे पोलीस दलात ६८६ रिक्त पदांसाठी भरती, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Thane Police Bharti 2024 : अनेकांना पोली दलात (Police Bharti नोकरी करण्याची इच्छा असते, अशा तरुणांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, ठाणे पोलीस विभागांतर्गत (Thane Police Departments) रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नगरमध्ये राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू, विखेंसाठी शिंदे आणि अजितदादांकडून मोर्चेबांधणी 

या भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण ६८६ जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार http://www.Thanepolice.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.

पदांचा तपशील-

पोलीस कॉन्स्टेबल – 666 आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर – 20 च्या रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – ठाणे

शैक्षणिक पात्रता –

पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा.

आवश्यक कागदपत्रे –
एसएससी/एचएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT, खेळाडू प्रमाणपत्र, मागासवर्गीय उमेदवारांसाठी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, भूकंपग्रस्तांसाठी प्रमाणपत्र, पोलिसांच्या मुलाचे प्रमाणपत्र, अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

Ajit Pawar भाजपसोबत म्हणजे महादेवाच्या पिंडीवर विंचू, चप्पल मारायचीही अडचण; शिवतारेंचा टोला 

वयोमर्यादा

पोलीस कॉन्स्टेबल – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय – १८ ते २८ वर्षे;
तर मागासवर्गीय उमेदवारांचे वय 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे.

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय – १९ ते २८ वर्षे;
तर मागासवर्गीय उमेदवारांचे वय – 19 ते 33 वर्षे असावे.

अर्ज फी –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये;
तर मागासवर्गीयांसाठी हे शुल्क 350 रुपये असेल.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लिंक –
policerecruitment2024.mahait.org

अधिसूचना –

https://drive.google.com/file/d/1mqgN-n43gLU4DdGf6rgYA539pYl5L3u_/view?pli=1

निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, प्रमाणपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतील.

अर्ज कसा करावा?
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. उमेदवारांची चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळं उमेदवारांनी अचूक माहीती भरावी. अर्जाच्या भरतांनाच्या वेळी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. स्कॅन केलेला पासपोर्ट आणि स्वाक्षरी अर्जाच्या वेळी JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करावी. UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे अर्जाची फी ऑनलाइन भरावी.

follow us

वेब स्टोरीज