नगरमध्ये राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू, विखेंसाठी शिंदे आणि अजितदादांकडून मोर्चेबांधणी

नगरमध्ये राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू, विखेंसाठी शिंदे आणि अजितदादांकडून मोर्चेबांधणी

अहमदनगर – राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्ष देखील निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. नगर शहरांमध्ये नगर दक्षिण लोकसभेच्या अनुषंगाने राजकीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, (Ajit Pawar) शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या राजकीय पक्षांच्या मिळावे तसेच बैठका पार पडल्या. आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाल्याचं या बैठकातून स्पष्ट झाले.

Manoj Jarange : लोकसभेसाठी ठरलं! हजार नाही, प्रत्येक जिल्ह्यात एक अपक्ष; जरांगेंनी सांगितला प्लॅन 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून आता हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगर दक्षिणमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पक्षाकडून तिकीट जाहीर झाले आहे. विखेंकडून लोकसभेसाठी प्रचार सुरू झाला आहे. यात नुकतेच शिवसेनेच्या शिंदे गटाचा संवाद मिळावा नगर शहरात पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना विखेंच्या विजयासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या रेड ड्रेसमधील बोल्ड अदांनी लावलं चाहत्यांना वेड

दरम्यान पंकजा मुंडे या नगर शहरात आले असता त्यांनी देखील विखेंना पाठबळ देत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. यामुळे महायुतीच्या उमेदवारांसाठी शिवसेनेकडून देखील जोरदार तयारी केली जाते आहे.

विखेंसाठी अजितदादांची राष्ट्रवादी सरसावली
महायुतीच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील विखे यांच्या विजयासाठी पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारा संदर्भात प्राथमिक चर्चा झाली. तसेच प्रचाराचे नियोजन आणि मतदार संघातील बैठका याबाबत नियोजन केले. ४ एप्रिलला शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

लंके यांच्यासाठी मविआची बैठक
अजित पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत असलेले आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी इच्छुक आहे. लंके यांचा पक्षप्रवेश झाला नसला तरी मात्र लोकसभेसाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतल्या. नुकतेच नगर शहरांमध्ये मविआची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते. येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा देखील झाल्याची माहिती मिळते आहे. लंके यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी नगरदक्षिणेमध्ये विखे विरुद्ध लंके असाच संघर्ष पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube