प्रत्येक जिल्ह्यात एकच अपक्ष द्या! जरांगेंनी राजकीय पक्ष अन् निवडणूक आयोगाची केली सुटका
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज आंतरवाली सराटीत आयोजित करण्यात आलेल्या महाबैठकीत मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची मतं फुटू नयेत यासाठी एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार असा नवा फॉर्म्युला या बैठकीत त्यांनी दिला. तसेच मी राजकारणात जाणार नाही पण, मराठा व्होट बँक काय आहे ती ताकद दाखवून देणार, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. आंतरवाली सराटीत आज मराठा समाजाच्या महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी राज्यभरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील .यांनी उपस्थितांना संबोधित केले.
Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच लढत देतील; काँग्रेस ठाकरेंची मनधरणी करणार!
निवडणुकीत जास्त अर्ज दाखल झाल्यास समाज अडचणीत येण्याची शक्यता आहे. आपली उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. जर निवडणुकीत जास्त उमेदवार असतील तर मतं फुटतील. मतांची ही फूट टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकाच व्यक्तीची निवड करा. उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय तुम्हीच घ्या. ते मी सांगणार नाही. आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेलेत त्यांचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. आपलं आरक्षण दिल्लीत नाहीच, असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्यास मराठा मतं फुटतील. एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात ठेवा. मराठा समाजाला ताकद दाखवायची असेल तर फॉर्मही तुम्हीच ठरवा. उमेदवारही तुम्हीच द्या. पुढील निर्णय 30 तारखेला जाहीर करणार, असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मी राजकारणात येणार नाही
मी राजकारणात येणार नाही. तो माझा मार्ग नाही. मी निवडणुकीत उभा राहणार नाही. राजकीय ताकद दाखवायची असेल तर मतांत रुपांतर करायचं असेल तर दहा हजार फॉर्म भरू नका. निवडणुकीत एक उमेदवार द्या आणि त्याला निवडून आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश
या बैठकीच्या पार्श्वभुमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्यभरातील समाजबांधव या बैठकीला येणार असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेट लावले होते. तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.