Manoj Jarange : आंतरवाली सराटीत आज महाबैठक; जरांगे पाटील नेमकं काय सांगणार?

Manoj Jarange : आंतरवाली सराटीत आज महाबैठक; जरांगे पाटील नेमकं काय सांगणार?

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) उपस्थितीत आज आंतरवाली सराटीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून हजारो मराठा समाजबांधव (Maratha Reservation) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची आहे. या महाबैठकीच्या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनानेही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील नेमके काय सांगणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange : मला अटक करुनच दाखवा, मनोज जरांगेंचं सरकारला ओपन चॅलेंज

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. मात्र, सरकारचे हे आरक्षणाला विरोध करत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून समाजला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे.

सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवर साडेसहा लाख हरकती आल्या आहेत. यावर सुनावणी होऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले होते. याच काळात देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. आता आचारसंहितेचा काळ सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने आजची बैठक होत आहे. आगामी निवडणुकीत मरठा समाजाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे.

Manoj Jarange Patil: ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर रिलीज

आज सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यभरातील समाजबांधव या बैठकीला येणार असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅरिकेट लावले आहेत. तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube