The tradition of gambling on the night of Diwali : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण! या दिवशी घराघरांत लक्ष्मीपूजन आणि गणेशपूजन करून सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते. दिवाळीच्या रात्री धनप्राप्तीसाठी अनेकजण विविध धार्मिक उपाय करतात. मात्र, दिवाळीच्या रात्री जुगार खेळण्याचीही एक जुनी परंपरा आहे. विशेष म्हणजे, या परंपरेमागे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित एक पौराणिक कथा सांगितली जाते. पण दिवाळीच्या रात्री जुगार खेळणं शुभ मानलं जातं की अशुभ? यामागील धार्मिक मान्यता नेमकी काय आहे? जाणून घेऊया…
ज्योतिषाचार्य करिश्मा कौशिक यांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन जुगार खेळण्याची परंपरा काही ठिकाणी पाळली जाते. मात्र, या परंपरेमागील पौराणिक कथेकडे पाहिल्यास त्याला वेगळाच अर्थ असल्याचं सांगितलं जातं. पौराणिक कथेनुसार, दिवाळीच्या रात्री भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांसोबत जुगार खेळत असत. या खेळामुळे त्यांच्यातील प्रेम आणि आपुलकी अधिक वाढत असे. त्यामुळे दिवाळीच्या रात्री मनोरंजनासाठी जुगार खेळण्याची परंपरा सुरू झाल्याची धार्मिक मान्यता आहे.
वैभव चव्हाण मृत्यू प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक, CID किंवा SIT चौकशीची मागणी, सरकारला दिला इशारा!
मात्र, याचा अर्थ असा नाही की दिवाळीच्या रात्री पैशांचा डाव लावून जुगार खेळणं शुभ आहे. उलट, पैशांची बाजी लावून खेळणं अशुभ आणि नुकसानकारक मानलं जातं. ज्योतिषाचार्य करिश्मा कौशिक यांच्या मते, जुगार खेळताना पैशांची बाजी लावल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. प्रत्येक युगात जुगारामुळे मोठं नुकसान झाल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. महाभारतातील पांडव आणि कौरव यांच्यातील द्यूतसभेचा प्रसंग याचं मोठं उदाहरण आहे. जुगारामध्ये पांडवांनी आपलं राज्य, संपत्ती आणि अगदी द्रौपदीलाही पणाला लावलं होतं. त्यामुळे जुगाराची सवय माणसाला आर्थिक आणि कौटुंबिक संकटात टाकू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार जुगाराचा संबंध राहू ग्रहाशी जोडला जातो. राहू प्रतिकूल स्थितीत असल्यास व्यक्तीला जुगाराचं व्यसन लागू शकतं, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. अशा सवयीमुळे आयुष्यभर कष्ट करून कमावलेली संपत्तीही गमावण्याची वेळ येऊ शकते. दिवाळीच्या रात्री जुगार खेळायचाच असेल, तर तो केवळ मनोरंजनासाठी आणि कोणतीही पैशांची बाजी न लावता खेळावा, असं ज्योतिषाचार्य सांगतात. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन खेळ खेळल्यास त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आनंद वाढू शकतो.
अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंचा ‘तो’ गुप्त डाव; शिवसेना आमदाराचा दाव्याने राजकारणात खळबळ
मात्र, पैशांचा डाव लावून जुगार खेळणं टाळावं. धार्मिक मान्यतेनुसार, अशा प्रकारे जुगार खेळल्यास माता लक्ष्मी नाराज होते आणि वर्षभर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी समजूत आहे. त्यामुळे दिवाळीचा सण आनंदाने साजरा करा, कुटुंबीयांसोबत वेळ घालवा आणि जुगाराच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी करण्यापासून दूर राहा.
