TikTok : भारतीय सोशल मीडियावर पुन्हा एकदा टिकटॉक (TikTok) चर्चेत आहे. 2020 मध्ये टिकटॉकवर भारत सरकारकडून (Government of India) बंदी घालण्यात आली होती. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, टिकटॉक पुन्हा एकदा भारतात परतणार आहे. एका वृत्तानुसार चिनी व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आता भारतात परतणार आहे. कारण काही यूजर्सला टिकटॉकची वेबसाइट ॲक्सेस करता आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतात टिकटॉक परतणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत टिकटॉक गुगल ॲप किंवा ॲप्पल स्टोअरवर उपलब्ध नाही. तसेच भारत सरकारने आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
टिकटॉक भारतात परतणार?
टिकटॉक भारतात परतणार आहे का? याबाबत आतापर्यंत भारत सरकारसह टिकटॉक किंवा त्यांची मूळ कंपनी बाईटडान्सकडून देखील कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र काही यूजर्संना वेबसाईट ॲक्सेस करता आल्याने टिकटॉकचे चाहत्यांमध्ये नवीन लाट निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे काही यूजर्संनी एक्सवर म्हटले आहे की, काही यूजर्सने टिकटॉकची वेबसाइट ॲक्सेस केली आहे. त्यामुळे कंपनी टप्प्याटप्प्याने वेबसाइट भारतात लॉन्च करु शकते.
Banned Chinese platforms like AliExpress and TikTok are now accessible in India again after a 5 year ban! Are they making a comeback? What do you think? pic.twitter.com/XvhKSZthMN
— Tech Bharat (Nitin Agarwal) (@techbharatco) August 22, 2025
Dream 11, MPL, Bingo ॲप्सवर बंदी; ऑनलाइन गेमिंग विधेयकला राष्ट्रपतींची मंजुरी
2020 मध्ये भारतात टिकटॉकवर बंदी
भारत सरकारने जून 2020 मध्ये टिकटॉकसह अनेक चिनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतसरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचे सांगत देशात शेअरइट, एमआय व्हिडिओ कॉल, क्लब फॅक्टरी आणि कॅम स्कॅनरसह 59 चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. त्यावेळी भारतात टिकटॉकचे सुमारे 20 कोटी यूजर्स होते.