Download App

Twitter Down: ट्विटर पुन्हा डाऊन, लाखो युजर्स हैराण

Twitter Down: जगभरात ट्विटर डाऊन झाल्याची समस्या निर्माण झाली आहे. यानंतर लाखो युजर्संनी ट्विट रिफ्रेश होत नसल्याची तक्रार केली आहे. एलोन मस्ककडे मालकी आल्यानंतर ट्विटर डाउन होण्याची ही तिसरी वेळ आहे. काही युजर्संनी ट्विटरची ही समस्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली आहे.

ऑनलाइन सेवांमधील व्यत्ययांवर लक्ष ठेवणारी वेबसाइट डाउन डिटेक्टरने सांगितले की, सुमारे 4,000 वापरकर्त्यांनी सकाळी 8:15 वाजता ट्विटरवर समस्या नोंदवल्या. ट्विटरने अद्याप आउटेजवर कोणतेही विधान जारी केलेले नाही.

West Indies out of World Cup 2023: विश्वविजेता वेस्ट इंडिज, 48 वर्षांत प्रथमच विश्वचषकातून बाहेर

ट्विटर डाऊन होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 6 मार्च रोजी लिंकने काम करणे बंद केल्याने ट्विटरला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही युजर्स लॉग इन करू शकले नाहीत आणि काहींचे फोटो लोड होत नाहीत. फेब्रुवारीमध्येही ट्विटरची सेवा काही तास बंद होती. त्यावेळी युजर्स ना थेट संदेश वाचू शकले ना पोस्ट अपडेट करू शकले.

Disha Paatni Photo; पिंक कलरमध्ये दिशा पटानीचा कहर, पाहा फोटो

ट्विटर डाऊन झाल्यानंतर यूजर्संनी नाराजी व्यक्त केली होती. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी लोक इतर प्लॅटफॉर्मचा अवलंब करत आहेत. ट्विटर डाऊन असतानाही काही वापरकर्ते आनंद घेत आहेत. लोकांनी मीम्स बनवून इलॉन मस्कला ट्रोल देखील केले. काही वापरकर्त्यांनी लिहिले की, इलॉन मस्क ट्विटर रिस्टोअर करण्यात व्यस्त आहेत.

Tags

follow us