Upcoming EVs In India : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती (Petrol And Diesel Price) पाहता सध्या देशात अनेक जण इलेक्ट्रिक कार (Electric Car) खरेदी करताना दिसत आहे. सध्या कमी किमतीमध्ये जास्त रेंज देणाऱ्या भारतीय बाजारात एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार्स उपलब्ध आहे.
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये देशाची लोकप्रिय ऑटो कंपनी टाटा मोटर्स राज्य करत आहे. टाटा मोटर्स सध्या भारतीय बाजारात Tiago EV, Tigor EV, Punch EV आणि Nexon EV सारख्या दमदार इलेक्ट्रिक कार्सची विक्री करत आहे. तर आता पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार रेंज, पवरफूल बॅटरीसह आणखी काही इलेक्ट्रिक कार्स येत्या काही दिवसात भारतीय बाजारात टाटा मोटर्सकडून लाँच होणार आहे.
यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आणखी काहीही दिवस प्रतीक्षा करू शकतात. चला मग जाणून घेऊया भारतीय बाजारात टाटा मोटर्स कोणत्या कोणत्या इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.
Tata Curvv EV
भारतीय बाजारपेठेमध्ये टाटा मोटर्सकडून येत्या काही दिवसात Tata Curvv EV ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लाँच करण्यात येणार आहे. ग्राहकांना या कारमध्ये दमदार रेंज, जबरदस्त सेफ्टी फीचर्स आणि खूपच बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार 2024 च्या मध्यात बाजारात लाँच होणार आहे. ही कार सिंगल चार्जवर 400-500 किलोमीटरची रेंज देणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Tata Harrier EV
Tata Curvv EV नंतर भारतीय बाजारात टाटा मोटर्सकडून दुसरी एसयूव्ही कार Tata Harrier EV लाँच करण्यात येणार आहे. माहितीनुसार, कंपनी 2024 च्या उत्तरार्धात ही शानदार इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या कारमध्ये 60 kWh चा बॅटरी पॅक देण्यात येणार आहे यामुळे ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार एका चार्जमध्ये 500 किलोमीटर रेंज देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात ड्युअल-मोटर AWD सेटअप देखील कंपनीकडून देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Tata Safari EV
माहितीनुसार, Tata Harrier EV सोबत Tata Safari EV देखील लाँच करण्याची योजना तयार करत आहे. Tata Harrier EV आणि Tata Safari EV मध्ये जवळपास फीचर्स सारखेच असणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. कंपनी 2024 च्या उत्तरार्धात ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लाँच करू शकते.
मोठी बातमी! शाहरुख खानची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Tata Sierra EV
तर 2025 मध्ये भारतीय बाजारात टाटा मोटर्सकडून Tata Sierra EV इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लाँच करण्याची तयारी होत आहे. या कारमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक आणि पेट्रोल ICE पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Tata Sierra EV मध्ये Tata Harrier EV आणि Tata Safari EV सारखे सेफ्टी फीचर्स आणि पॉवरट्रेन देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.