Shah Rukh Khan: मोठी बातमी! शाहरुख खानची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Shah Rukh Khan: मोठी बातमी! शाहरुख खानची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार,  शाहरुख खानची प्रकृती बिघडल्याने त्याला अहमदाबादमधील (Ahmedabad) एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाचा त्रास झाल्याने शाहरुख खानला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात (KD Hospital) उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शाहरुख खान मंगळवारी (21मे ) रोजी त्यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी अहमदाबादला गेला होता. मात्र आज त्याला उन्हाचा त्रास होत असल्याने अहमदाबादच्या केडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानला उष्णतेमुळे डिहायड्रेशन झाले असून आज (22मे) दुपारी केडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सध्या केडी रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने त्याचे चाहते पोहोचत असल्याने पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

धक्कादायक.. विश्वास नांगरे पाटलांच नाव घेत महिलेची ऑनलाईन फसवणूक, 40 लाखांना घातला गंडा

रुग्णालयाबाहेर गर्दी जमा होऊ नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या शाहरुखवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

शिंदेंच्या बालेकिल्यात वर्चस्वाची लढाई, ठाण्यात कोण मारणार बाजी?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज