शिंदेंच्या बालेकिल्यात वर्चस्वाची लढाई, ठाण्यात कोण मारणार बाजी?

शिंदेंच्या बालेकिल्यात वर्चस्वाची लढाई, ठाण्यात कोण मारणार बाजी?

Thane Lok Sabha Election 2024  : नुकतंच राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024) पाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) 48 लोकसभेच्या जागांसाठी जोरदार टक्कर पाहायला मिळाली. यामुळे 4 जून रोजी राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

या लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Lok Sabha) लागले होते. याचा मुख्य कारण म्हणजे ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला आहे. शिवसेना (Shivsena) फुटीनंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत होत असल्याने ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ठाणे मतदारसंघात एकनाथ शिंदे आपला वर्चस्व राखणार का? हे तर 4 जुनलाच स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात विद्यमान खासदार राजन विचारे (Rajan Vichare) निवडणुकीच्या रिंगणात होते तर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेश म्हस्के (Naresh Mhaske) निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी भाजपकडून (BJP) ठाणे मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी होत होती. भाजपकडून गणेश नाईक लढण्यास इच्छुक होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला आणि आपले विश्वासू माजी महापौर नरेश म्हस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना धक्का देत ठाणे लोकसभा मतदारसंघातून विश्वासू नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर  केल्याने भाजपकडून इच्छुक असणारे गणेश नाईक नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणेश नाईक यांना भेटण्यासाठी नरेश म्हस्के घरी गेले होते मात्र तिथे त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. यामुळे अनेक भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र ठाण्यात दिसून येत होत. नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रत्यन देखील भाजपच्या मोठ्या नेत्याकडून करण्यात येत होते. त्यामुळे सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना खरी लढत महायुतीमधून मिळत होती हे मात्र खरं आहे. या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेली भूमिका निर्णयाक ठरणार आहे.

पाचव्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी झालेल्या मतदानात ठाणे लोकसभा मतदारसंघात  52.09 टक्के मतदान झाले असून त्यांमध्ये पुरुष मतदारांची संख्या  53.22  टक्के तर महिला मतदारांची संख्या 50.79 टक्के आणि इतर मतदारांची संख्या  17.39 टक्के आहे. यामुळे या मतदारसंघात पून्हा एकदा एकनाथ शिंदे आपला वर्चस्व राखणार का? याचा निर्णय 4 जून रोजी होणार आहे.

जातीय समीकरण

ठाणे लोकसभा मतदारसंघात  एकुण 25 लाख 7 हजार 372 मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 13 लाख 48 हजार 163 तर महिला मतदारांची संख्या 11 लाख 59 हजार 2 आहे. या मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या 80-85 टक्के आणि मुस्लिम मतदारांची संख्या 5-10 टक्के आहे.

2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे राजन विचारे यांनी 7,40,969 मत घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. आनंद परांजपे यांना 3,28,824 मत मिळाली होती. तर 2019 लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे मतदारसंघात 50 टक्के मतदान झाला होत.

पुण्यात सीएनजी गॅसचा तुटवडा; पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ठाणे मतदारसंघाचा थोडक्यात इतिहास

ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा भाईंदर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ठाणे, ऐरोली आणि बेलापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.  सुरुवातीला या मतदारसंघात काँग्रेसचा वर्चस्व होता मात्र त्यानंतर या मतदारसंघात जनता पार्टी आणि त्यानंतर भाजपने या मतदारसंघात आपले वर्चस्व निर्माण केले.

वेस्ट इंडिजचा चॅम्पियन खेळाडू आता दिसणार अफगाणिस्तानच्या संघात, बजावणार मोठी भूमिका

मात्र त्यानंतर मुंबईसह या मतदारसंघात देखील शिवसेनेचं वजन वाढत गेले आणि 1996 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद परांजपे यांनी विजय मिळवला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube