बोट बुडेल तेव्हा ‘तो’ उंदीर पहिला पळेल, राजन विचारेंनी म्हस्केंना डिवचले !
Rajan Vichare On Naresh Mhaske: उद्धव ठाकरे गटातील नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते यांच्यामध्ये कोणत्याही मुद्द्यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असतात. आता खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , खासदार श्रीकांत शिंदे व शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के ( Naresh Mhaske) यांच्यावर जोरदार टीका केली. नरेश म्हस्के हे उंदीर आहेत. बोट बुडेल तेव्हा हा उंदीर पहिला पळेल, असा निशाणा विचारे यांनी म्हस्केवर साधला आहे. (mp Rajan Vichare On Naresh Mhaske, eknath shinde and shrikant shinde)
खासदार राजन विचारे म्हणाले, मिंधे गट हा गद्दार आहे. या गद्दारांना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. अकरा महिन्यांपासून काय तमाशा सुरू आहे. हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी आनंद आश्रम काढला. त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचे नाव लावले आहे. हिम्मत असेल तर दुसरी वास्तू घेऊन त्याला तुमचे नाव द्या, असे आवाहन खासदार विचारे यांनी केले आहे.
पाटील, सावंत, सत्तार, भुमरे अन् राठोडांना डच्चू? भाजपाच्या अहवालाने खळबळ!
दिवे येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका कार्यक्रमात युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यावरून खासदार विचारे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विचार म्हणाले, युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही चूक कोणाची आहे. त्या युवकाचे कुटुंबाचे काय होणार आहे, याचा विचार करण्याएेवजी माइकवर भाषण दिले जात होते. त्याची लाच नाही वाटली. लोकांचे पाणी बंद ठेवून कार्यक्रमाला बोलविण्यात आले ही दादागिरी आहे. जनता त्यांना नक्कीच धडा शिकवील. कोणाचे हॉटेल तोडले जात आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे आरोपही विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केले आहेत.
औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्या प्रकरणी आज भिंगार बंद
काशीनाथ गाडेकर नाट्यगृहाला आनंद दिघेंचे नाव देण्यात येणार होते. त्याला मातोश्रीवरून विरोध झाल्याचा आरोप म्हस्के यांनी केला होता. त्याला उत्तर देताना विचारे म्हणाले, बोट बुडेल तेव्हा हा उंदीर पहिल्यांदा पळून जाईल. त्या उंदराला मीच शिवसेनेते घेऊन आलो आहे. ज्या दिवशी तोंड उघडेल तेव्हा कळेल. शिंदे गटामध्ये हिम्मत असेल निवडणुका घेऊन दाखवा. इशारा देणे बंद करा, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशाराही विचारे यांनी दिला आहे.