UPI Payment : देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार एक नवीन योजना लागू करण्यचा विचार करत आहे. देशात जर ही नवीन योजना लागू झाली तर यूपीआयने पेमेंट (UPI Payment) करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिंटच्या अहवालानुसार, ही योजना देशात लागू करण्यात आली तर यूपीआयद्वारे पेमेंट करणे क्रेडिट कार्डपेक्षा (Credit Card) स्वस्त आणि फायदेशीर होणार आहे.
माहितीनुसार, ही योजना लागू करण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी एक बैठक घेणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना काही सवलत देण्याचा विचार करत आहे. जर तुम्ही वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा पेमेंट यूपीआयद्वारे केले तर तुम्हाला तीच वस्तू थोड्या कमी पैशात मिळणार आहे. याचा अर्थ तुम्हाला या वस्तू खरेदीवर डिस्काउंट मिळणार आहे.
जर तुम्ही क्रेडिट कार्डवर पेमेंट केला तर दुकानदाराला 2% ते 3% MDR (व्यापारी सवलत दर) भरावा लागतो. एमडीआर एक प्रकारचा कर आहे. जो दुकानदाराला द्यावा लागतो. जर तुम्ही 100 रुपयांची वस्तू खरेदी केली आणि पेमेंट कार्डने केला तर दुकानदाराला 2-3 रुपयांचे नुकसान होते मात्र यूपीआयवर एमडीआर नसल्याने दुकानदाराला पूर्ण 100 रुपये मिळतात. त्यामुळे आता सरकारकडून ही योजना यूपीआयवर देखील लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे. ही योजना लागू झाल्यानंतर 100 रुपयांच्या वस्तूसाठी तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट केला तर तुम्हा फक्त 98 किंवा 99 रुपये खर्च येणार.
भाजप सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये Operation Sindoor शिकवले जाणार
ग्राहकांना होणार फायदा
सरकारने ही योजना लागू केली तर याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. योजना लागू झाल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक खरेदीत बचत होणार आहे. यासाठी सरकार ई-कॉमर्स कंपन्या, बँकिंग संस्था आणि एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) शी चर्चा असल्याची देखील माहिती समोर आली आहे.