मोठी बातमी! उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे आणि कसा चेक कराल रिझल्ट?

HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (Maharashtra State Board of Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या (HSC) निकालाबाबत एक मोठी अपडेट आलीये. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकाल उद्या (5 मे ) जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रक काढून याबाबतची माहिती दिली.
माझे अंघोळ करतानाचे व्हिडिओ…करुणा शर्मांचा आणखी एक खळबळजनक आरोप, प्रकरण नेमकं काय?
बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर कधीही निकालाची तारीख जाहीर केली जाऊ शकते असेही सांगण्यात येत होतं. त्यानुसार, आज बारावीच्या निकालाची तारीख मंडळाने जाहीर केली. मंडळाच्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या (सोमवारी) 5 मे रोजी दुपारी जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना उद्या दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
भारताचा वॉटर स्ट्राइक! बगलिहार धरणातून रोखले चिनाब नदीचे पाणी; पाकिस्तानला जबर दणका
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली आणि ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०,५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती.
तर ही परीक्षा राज्यभरातील ३३७३ मुख्य केंद्रांवर घेण्यात आली. बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ प्रादेशिक मंडळांतर्फ आयोजित करण्यात आली होती.
खालील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
कसा चेक कराल निकाल?
– विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
– ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ ही लिंक होमपेजवर दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.
– क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल. तिथे सीट नंबर टाका आणि नंतर आईचे नाव टाका. नंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
– यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– हा रिझल्ट डाउनलोड करून ठेवा.
पुनर्मूल्यांकनासाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?
ऑनलाइन निकालानंतर, विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाई पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 6 मे 2025 ते 20 मे 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच, ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.