Download App

Forest Guard Recruitment 2023: वन विभागात हजारो पदांसाठी जागा, अंतिम तारीख संपण्यापूर्वी अर्ज करा

Forest Guard Recruitment 2023 : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वनविभागाकडून हजारो पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत साइट mahaforest.gov.in ला भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची तारीख संपत आल्यामुळे उमेदवारांकडे जास्त वेळ नाही. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 30 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

अशा आहेत जागा
या भरतीद्वारे वनरक्षकाची 2138 पदे, लेखापालाची 129 पदे, सर्वेक्षकाची 86 पदे, लघुलेखक (एलजी) 23 पदे, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 15 पदे, लघुलेखक (एचजी), कनिष्ठ अभियंता (एचजी) 13 पदे गट क) भरण्यात येणार आहेत आणि वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) ची 5 पदे भरली जाणार आहेत.

पात्रता
वनरक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी/12वी उत्तीर्ण असावा. लेखपाल/लेखापाल (गट क) या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मराठी भाषा अवगत असावी. सर्वेक्षकसाठी उमेदवार 12वी पास, मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Asian Games 2023 : बीसीसीआयचा यू टर्न, भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ चीनमध्ये खेळायला जाणार!

अॅडवान्स लघुलेखक (गट बी) साठी उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि कमीत कमी 120 शब्दांच्या लघुलेखनाच्या गतीमध्ये प्राविण्य दाखवलेले असावे. कनिष्ठ लघुलेखक (गट बी) साठी उमेदवाराने माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, त्याला प्रति शब्द किमान 100 शब्दांच्या वेगाने लघुलेख माहित असावा. कनिष्ठ स्थापत्य अभियंता (स्तर बी) सिव्हिल इंजिनीअर डिप्लोमा.

Yoga Tips : ‘हेडॅक’ कमी करायचाय? मग, मदत घ्या ‘या’ खास योगासनांची

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) मराठी भाषेचे ज्ञान, गणित, अर्थशास्त्र, व्यवसाय, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील पदवीधर. कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) या पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान, गणित, अर्थशास्त्र, व्यवसाय, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय पदानुसार 27/40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

Tags

follow us