Asian Games 2023 : बीसीसीआयचा यू टर्न, भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ चीनमध्ये खेळायला जाणार!

  • Written By: Published:
Asian Games 2023 : बीसीसीआयचा यू टर्न, भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघ चीनमध्ये खेळायला जाणार!

Asian Games 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास नकार दिला होता. कॉमनवेल्थ गेम्सप्रमाणेच आशियाई गेम्समध्येही टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाईल. (BCCI’s U-turn, Indian women’s and men’s cricket team will play in China!)

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, पुरुषांचा संघ ‘ब’ संघ असेल कारण याच काळात विश्वचषकही खेळवला जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. तर महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख खेळाडू हा खेळ खेळण्यासाठी चीनला जाणार आहेत. बीसीसीआय 30 जूनपूर्वी खेळाडूंची यादी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला पाठवणार असल्याचे कळते.

BCCI चा मोठा निर्णय; महिला व पुरुष दोन्ही संघ होणार एशियन गेम्समध्ये सहभागी

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडू वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. अशा स्थितीत युवा खेळाडूंचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत उतरू शकतो. यामध्ये बहुतांश खेळाडू आयपीएल स्टार असतील. कर्णधारपद कोणाला मिळणार याचा अहवाल अद्याप आलेला नाही.

2010 आणि 2014 च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला. मात्र बीसीसीआयने संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. जकार्ता येथे 2018 च्या गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला नव्हता. पण या वर्षी क्रिकेट चीनमधील खेळांमध्ये परतणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा गेल्या वर्षीच होणार होत्या. मात्र कोरोनामुळे कालावधी एक वर्षाने वाढवण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube