‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र’ योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड…

‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र’ योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड…

मुंबई : पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना दिलासा देण्यासाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ (‘Vitthal Rakhumai Warkari Bima Chhatra Yojana’) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकाने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. दरम्यान, आता ही योजना राबवण्यासाठी विमा हप्ता भरण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड (IFFCO Tokio General Insurance Co. Limited) या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीस विमा हप्त्यापोटी दोन कोटी ७० लाख रुपये अदा करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागाने जारी केला आहे. (Selection of IFFCO Tokyo Insurance Company for Vitthal Rakhumai Warkari Insurance Umbrella Scheme)

Darshana Pawar Murde Case : दर्शनाला चरित्रहीन म्हणणाऱ्यांना, गुरूने स्क्रीनशॉट शेअर करत फटकारले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर वारीत दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता राज्यशासनाद्वारे विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना राबविण्याबाबत आदेश काढला आहे. त्यानंतर आता विमा प्रशासनाच्या संचालकांनी ही योजना राबविण्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड या विमा कंपनीची निवड केली.

या योजनेखाली १५ लाख वारकऱ्यांसाठी विमा हप्ता भरण्यासाठी २ कोटी ७० लाख रुपये इतकी रक्कम इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड या कंपनीस अदा करण्याची व या अनुषंगाने इतर काही सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार ही मान्यता देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

‘मी तिकीट खरेदी करूनही…’ महाभारत फेम गजेंद्र चौहान Adipurush वर संतापले

ही योजना यंदा आषाढी वारीसाठी क्षेत्र पंढरपूर येथे पायी, खाजगी अथवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू असणार आहे. योजनेचा विमा कालावधी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३० दिवसाचा राहिलं. या योजनेंतर्गत विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी संबंधितांनी विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक असल्याचं या शासन निर्णयात सांगितलं.

तसेच वारकऱ्यांना ते ज्या गावाचे शहराचे रहिवासी आहेत, त्या गावाच्या शहराच्या संबंधित तहसिलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. सर्व तहसिलदार संबंधित वारकरी आषाढी वारीसाठी गेल्याची खात्री करुन तशा स्वरुपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याच्या वारसदारांना देणार आहेत.

होय, झाकीर नाईकने साडेचार कोटी दिले होते, विखे पाटलांनी इतिहास सांगत दिलं राऊतांना उत्तर

या योजनेंतर्गत एखाद्या दुर्घटनेत, अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास या वारकऱ्याच्या वारसास एक लाख रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे. तसेच दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येणार आहे.

दोन्ही हात, दोन्ही पाय दोन्ही डोळे, एक हात पाय व एक डोळा निकामी झाल्यास १ लाख, एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५० हजार रुपये याव्यतिरिक्त वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी ३५ हजर रुपये किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत एखाद्या दुर्घटनेत अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास १ लाख रुपये विमा या रकमेव्यतिरिक्त संबंधित वारकऱ्याच्या वारसास चार लाख रुपये इतकी रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येईल.

दरम्यान, एखाद्या वारकऱ्यासोबत अशी दुर्घटना घडल्यास संबंधित वारकऱ्याच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या योजनेंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करणारा अर्ज आल्यास, तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूचे कारण, मृत्यूचा कालावधी व इतर आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करुन संबंधित वारकत्यांच्या वारसास ४ लाख सानुग्रह अनुदान मंजूर करुन वितरित करतील, असे या निर्णयात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube