‘मी तिकीट खरेदी करूनही…’ महाभारत फेम गजेंद्र चौहान Adipurush वर संतापले

‘मी तिकीट खरेदी करूनही…’  महाभारत फेम गजेंद्र चौहान Adipurush वर संतापले

Adipurush : अभिनेता प्रभासचा (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता महाभारत फेम अभिनेते गजेंद्र चौहान देखील आदिपुरूष चित्रपटावर संतापले आहेत. (Mahabharat fame Gajendra Chauhan Aggressive on Adipurush )

फडणवीसांच्या ओळी, बाळासाहेबांचा व्हिडिओ अन्…; भाजपच्या वाघिणीनं ठाकरेंना डिवचलं

बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेमध्ये युधिष्ठीरची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी देखील या चित्रपटाला विरोध केला आहे. ते म्हणाले की, मी तिकीट खरेदी करूनही हा चित्रपट पाहिला नाही. चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा हे माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे नाही. या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच मला हा चित्रपट पाहण्यासारखा वाटला नव्हता.

विस्कटलेले केस अन् सुकलेला चेहरा; ‘या रावजी’ लावणी फेम शांताबाईंवर भीक मागण्याची वेळ

तसेच आता चित्रपटाचे डायलॉग बदलून काय उपयोग अधीच चित्रपटाला नाकारून लोकांनी निर्मात्यांना शिक्षा दिली आहे. हा चित्रपट रिलीज करायला नव्हता पाहिजे. त्यवर कारवाई व्हावी सरकरने या चित्रपटावर बंदी आणावी. अशी मागणी देखील चौहान यांनी केली. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

दरम्यान सिनेमामधील डायलॉग, कलाकांचे लूक्सवर सोशल मीडियावर सतत टीका केली जात आहे. या सिनेमातील हनुमानाच्या एका डायलॉगवर देखील अनेकांनी मोठा आक्षेप घेतला आहे. आता आदिपुरुष सिनेमाच्या मेकर्सने सिनेमातील काही डायलॉग्स बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कपड़ा तेरे बाप का…तो जलेगी भी तेरे बाप की’ या आदिपुरुष सिनेमामधील हनुमानाच्या डायलॉगवर अनेक चाहत्यांनी टीका केली आहे. आता हा डायलॉग बदलण्यात आला आहे. तसेच सिनेमामधील इतर काही डायलॉग देखील बदलण्यात आले आहे.

‘तू अंदर कैसे घुसा, तू जानता भी है कौन हूं मैं’ हा डायलॉग बदलून ‘तुम अंदर कैसे घुसे, तुम जानते भी हो कौन हूं मैं’ असा करण्यात आला आहे. ‘कपड़ा तेरे बाप का…तो जलेगी भी तेरे बाप की’ हा आदिपुरुष सिनेमातील बजरंगबलीचा डायलॉग बदलून ‘कपडा तेरी लंका का …तो जलेगी भी तेरी लंका’असा करण्यात आला आहे.‘जो हमारी बहनों…उनकी लंका लगा देंगे’ हा डायलॉग बदलून ‘जो हमारी बहनों…उनकी लंका में आग लगा देंगे’. असा करण्यात आला आहे. ‘मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को लंबा कर दिया’ हा आदिपुरुष सिनेमातील डायलॉग बदलून ‘मेरे एक सपोले ने तुम्हारे शेषनाग को समाप्त कर दिया’ असा करण्यात आला आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या चित्रपटात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेमध्ये आहे. सनी सिंह लक्ष्मणाच्या तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सैफ अली खानने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ सिनेमाचा जोरदार बोलबाला बघायला मिळाला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube