फडणवीसांच्या ओळी, बाळासाहेबांचा व्हिडिओ अन्…; भाजपच्या वाघिणीनं ठाकरेंना डिवचलं

फडणवीसांच्या ओळी, बाळासाहेबांचा व्हिडिओ अन्…; भाजपच्या वाघिणीनं ठाकरेंना डिवचलं

BJP On Udhdhav Thackeray :   बिहारच्या पाटण्यामध्ये देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे नेते उपस्थित झाले आहे. यावरुन ठाकरे गटातील नेत्यांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येते आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धवजी बाळासाहेबांचा हा व्हीडीओ पाहा… यात बाळासाहेबांनी लालू प्रसाद यादवला काय म्हटलं होतं ते ऐका. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कशी दिलीय ते समजेल… बाळासाहेबांच्या भाषेत “तोंडात चारा भरलेला, म्हशीजवळ लोळणारा लालू..” बाळासाहेबांनी लालूला नालायक म्हटलं होतं… आता अशा नालायका समोर लोटांगण घालण्याची वेळ तुमच्यावर आलीय. देवेंद्र फडणवीस उगाच नाही म्हणाले तुम्हाला…खरंच काय होतास तू काय झालास तू, असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण

या बैठीकवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी शेजारी बसण्यावरून फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं की, सातत्याने मेहबुबा मुफ्ती यांच्या नावावर भाजपला नेमही टोमणे मारणारे उद्धव ठाकरे मुफ्ती यांच्यासोबत तर चाललेच आहे, पण आता तर ते थेट त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. हा केविलवाणा प्रयत्न केवळ परिवारवादी पक्ष वाचण्यासाठी चालू असून यासाठी ही केलेली एकप्रकारची तडजोड असून, याचा कुठलाही परिणाम होईल असे वाटत नाही.

प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकणाऱ्या भुजबळांचा यू टर्न; म्हणाले, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची…

या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध नेते उपस्थित झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube