प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकणाऱ्या भुजबळांचा यू टर्न; म्हणाले, फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची…
Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत पद देण्याची मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी थेट प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला होता. आज मात्र, त्यांनी आपल्या या वक्तव्यापासून यू टर्न घेतल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसमावेशक हा पक्ष आहे इतकंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही. माझं स्वतः च काय. लोकांनी सांगितलं भुजबळांना प्रदेशाध्यक्ष व्हायचंय पण, मला व्हायचं नाही. भुजबळांना हे पाहिजे आहे की आपल्या पार्टीची इमेज बदलली गेली पाहिजे. सगळ्यांना घेऊन चालतो आहोत अशी इमेज तयार झाली पाहिजे जी आज आपल्याला त्रासदायक ठरत आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी काल केलेल्या वक्तव्यावर दिले.
Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’
देशात अजूनही समाजा समाजाचं राजकारण चालत आहे. दोन महत्वाची पदं विधिमंडळातला प्रमुख नेता आणि दुसरा पक्षाचा अध्यक्ष. विधिमंडळ पक्षाचा नेता हा पुढे उपमुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो. ही जी दोन पदं आहेत ती वेगवेगळ्या समाजाला देण्याची पद्धती आहे. राजकीय सोयीसाठी तसेच सर्व समाज एकत्रित रहावे यासाठी.
त्यावेळी राष्ट्रवादीने पाचपुतेंना प्रदेशाध्यक्ष केलं
चंद्रशेखर बावनकुळेंना तर तिकीट सुद्धा नाकारलं होतं. पण त्याच बावनकुळेंना भाजपने पुढं पक्षाचा प्रांताध्यक्ष केलं. काँग्रेसने नाना पटोले यांना अध्यक्ष केलं. पुढे मात्र दोन्ही पदं एकाकडेच ठेवायचं काम झालं. ही काय परंपरा सुरू झाली. मी तर पक्षाचा विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषदेत काम करत होतो. शिवसेना भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधात लढलो. पवार साहेबांनी आणि आम्ही मिळून राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला. पुढे तीन महिन्यातच निवडणुका लागल्या. पुढे मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बबनराव पाचपुते यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. पुढे हळूहळू हे सगळं बदलत गेलं.
‘काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?’ भाजप नेत्याचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज!
लोकं म्हणाले म्हणून मी म्हटलं
आजही मला असं वाटतं की काल अजितदादांनी सांगितले दुसऱ्या राज्यातील प्रादेशिक पक्ष स्वतःच्या ताकदीवर निवडून येतात. पण, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारखा राष्ट्रीय पातळीवर नेता असतानाही आपण राज्यात स्वबळावर येऊ शकलो नाही. पक्षाचा मुख्यमंत्री करू शकलो नाही. कारण, यात आहे की आजही ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये (BJP) आहे, शिवसेनेत आहे. काँग्रेसमध्येही आहेतच. या सगळ्या समाजाला बरोबर घेतल तरच आपण पुढे जाऊ शकतो. मग मी पण म्हणणं मांडलं. आमच्या पक्षात खूप लोक आहेत. आव्हाड, मुंडे आहेत. मध्यम दमाचे पाहिजे असतील तर तटकरे आहेत. जुन्या दमाचे पाहिजे असतील तर भुजबळ आहेत. याव्यतिरिक्त आणखीही लोक पक्षात आहेत. ओबीसीचा नाही तर दुसऱ्या समाजाचा घ्या हरकत नाही, असे भुजबळ म्हणाले.