पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण
Amol Mitkari on Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतचं पक्षाच्या एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षनेते पदाावरून मुक्त होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. त्यांनी आपल्याला पक्ष संघटनेसाठी काम करायचं आहे. असं देखील म्हटलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर ‘पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची शासकीय पूजा करतील’ असं म्हणत अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. ( Amol Mitkari Said Ajit Pawar will do Mahapooja of Viththal as CM of Maharashtra )
Ahmednagar Crime : शेवगाव शहर हादरलं! दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी म्हणाले की, ‘आपल्या महाराष्ट्राला वारीची मोठी परंपरा आहे. माझे वाड-वडिलही या वारीला यायचे यावर्षी मी देखील वारीला आलो आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून वारीमध्ये देखील जातीय वाद पाहायाला मिळत आहे. त्यामुळे आम्ही संत तुकाराम महाराजांनी शिकवलेला मानवतेचा धर्म घरा घरात पोहचवण्यासाठी आम्ही वारी तुमच्या दारी ही संकल्पना राबवली आहे.
Sharad Pawar : विरोधीपक्षाच्या बैठकीत देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून पुढची भूमिका ठरवणार
या संकल्पनेला गुरूवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी षणमुखनंद सभागृहामध्ये सांगितलं की, तुकाराम महाराजांचे अभंग, तुकोबांची गाथा, त्यांच्या जीवनावरील अभंग घरा घरात पोहचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळेच मी वारीला सहकुटुंब आलो आहे. यावेळी मिटकरी यांनी अक सुचक वक्तव्य केलं.
मिटरकरी म्हणाले की, आषाढी एकादशीची विठुरायाची पुढची महापूजा ही आताचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून करतील. त्यांना हा मान मिळो अलं साकडं मी विठ्ठलाला घातलं आहे. कारण आता ज्यांच्या नेतृत्वात राज्यतील राजकारण आहे. त्यामुळे आळंदीत पालखीत वारकऱ्यांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे वारकरी अस्वस्थ आहेत. मात्र ते प्रसंगी भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे देखील वागतील अशी टीका यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर अमोल मिटकरी यांनी केली आहे.’