Darshana Pawar Murde Case : दर्शनाला चरित्रहीन म्हणणाऱ्यांना, गुरूने स्क्रीनशॉट शेअर करत फटकारले

  • Written By: Published:
Darshana Pawar Murde Case : दर्शनाला चरित्रहीन म्हणणाऱ्यांना, गुरूने स्क्रीनशॉट शेअर करत फटकारले

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दर्शना पवार राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आली होती. तिचा मृतदेह काही दिवसांपूर्वी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरेला अखेर अटक केली आहे. विविध शहरात फिरत असलेल्या राहुलला मुंबईतील अंधेरी मध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. राहुलने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. दर्शनाने राहुलला लग्नासाठी नकार दिला होता. यातूनच राहुलने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. दर्शनाच्या मामाचे घर आणि राहुलचे घर समोरा समोर होते. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. मात्र काही दिवसापासून या प्रकरणात सोशल मीडियातून दर्शनावरही काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. या पोस्ट वाचून दर्शनाच्या संघर्षाच्या काळात तिला मार्गदर्शन करणारे कोपरगाव येथील कीर्तनकार सचिन पवार यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(pune-mpsc-topper-darshana-pawar-murder-case-look-at-this-screenshot-and-decide-for-yourself-how-she-was-thinking-facebook-post-viral)

ज्या लोकांनी दर्शनाच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यांना कीर्तनकार सचिन पवार चांगलेच फटकारले. तसेच त्यांनी या लोकांबाबत चीड व्यक्त केली. ‘दर्शनाच्या हत्याकांडाने पुरता हादरून गेलो आहे. त्यासोबतच दर्शनाविषयी समाजमाध्यमांवर अनेक लोक जसे व्यक्त होत आहेत हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो ती संवेदनशील होती, हुशार आणि समजदारही होती. घरची जाण होती. आई-वडिलांची चिंता होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते तिला. ती भक्कम व कणखर होती. अधिकारी होण्याअगोदचा तिचा मला पाठवलेल्या मेलचा स्क्रीनशॉट सोबत जोडतो आहे. त्यावरून ती कसा विचार करत होती ते पाहा,’ असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

पुढे पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात त्या दिवशी ती मित्रासोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेली व तिथं घात झाला. तिचं ट्रेकींगला जाणं चुकीचं नाही. मित्रासोबत जाणं हे ही चुकीचं नाही. त्यानं तिला लग्नाची मागणी घालणं हे ही चुकीचं नाही. इथं पर्यंत कोणताही गुन्हा नाही. राहूलचं प्रेम एकतर्फी होतं. दर्शनाने नकार दिल्यावर राहूल मधला नराधम जागा झाला आणि त्यानं तिचा जीव घेतला. हा राहूलचा गुन्हा आहे. यात दर्शनाचा काय गुन्हा ? आपण सर्वांनी तिला अप्रत्यक्ष गुन्हेगार ठरवणं, संस्काराच्या नावाखाली चारित्र्यहनन करणं बंद केलं पाहिजे. पुरूषी मानसिकतेतील गलिच्छ पोस्टी वाचल्यावर तिटकारा आला. बाईकडे आपण अधिक विवेकाने, समतेनं पहाण्याचं शिक्षण घ्यायची गरज आहे.

राहुलजी, तुम्ही लग्न करा आम्ही वर्हाडी होऊ! लालूंचा शाब्दिक कोटी अन् जोरदार हशा..

दर्शनाने सचिन पवारांना पाठवलेल्या मेलमध्ये काय म्हटलंय?

सचिन पवार यांची मार्गदर्शनपर भेट घेतल्यानंतर त्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये दर्शनाने आपला जीवनविषयक दृष्टीकोन आणि त्यामध्ये झालेल्या बदलाविषयी भाष्य केलं होतं. याच ईमेलचा स्क्रीनशॉट सचिन पवार यांनी शेअर केला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, ‘मी आधी फक्त माझ्या करिअरवर फोकस केला होता. पण तुमच्या भेटीनंतर मी आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन शिकले. आयुष्य खूप सुंदर आणि साधेपणाने जगता येऊ शकतं, असं मला वाटतं. तुम्ही दिलेलं एक उदाहरण खूप महत्त्वाचं होतं ते म्हणजे आपली लूट हे कोणी वरिष्ठ स्तरावरील लोक करत नाहीत, तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घेणारे पीएसआय स्तरावरील अधिकारीच करतात. हे सत्य असलं तरी ते बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक समस्यांपासून मी आधी पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. पण या समस्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे, हे तुमच्यामुळे माझ्या लक्षात आलं,’ असं दर्शनाने सचिन पवार यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube