होय, झाकीर नाईकने साडेचार कोटी दिले होते, विखे पाटलांनी इतिहास सांगत दिलं राऊतांना उत्तर

होय, झाकीर नाईकने साडेचार कोटी दिले होते, विखे पाटलांनी इतिहास सांगत दिलं राऊतांना उत्तर

Radhakrishna Vikhe replies Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत घेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. झाकीर नाईक याने विखे पाटलांच्या संस्थेत साडेचार कोटी रुपये का दिले असा सवाल करत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली होती. यावर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःच उत्तर देत मोठा खुलासा केला आहे.

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम, सावध राहा 

मंत्री विखे पाटील आज पुण्यात होते. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले. त्यावर विखे म्हणाले, संजय राऊतांचं आमच्यावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे हे मी अनेकवेळा सांगितले आहे. मला वाटतं तुम्ही पत्रकारांनी सुद्धा आता त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे.

अधिकाऱ्यांना तंबी देण्याची मंत्री विखे पाटलांवर आली वेळ; वाळू विक्री केंद्रावर नक्की काय झालं?

झाकीर नाईकने दहा ते पंधरा वर्षांपू्र्वी अडीच ते तीन कोटी रुपये प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिले होते. देणगी दिली होती. त्यानंतर त्याची चौकशी झाली. भारत सरकारनेही चौकशी करून दहा वर्षांपूर्वीच ती केस बंद केली आहे. त्यामुळे असं काही नाही की त्यात चौकशी झालेली नाही. त्यात त्यांना काहीच अनियमितता सापडली नाही. ज्यावेळी संस्थेला ही देणगी आली होती त्यावेळी नाईकला देशद्रोही ठरविण्यात आलं नव्हतं त्याअगोदरची ही घटना आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. परंतु, यात काहीच अनियमितता आढळून आली नाही, असे विखे म्हणाले.

मी स्वतः ईडीला पत्र द्यायला तयार 

असे असताना राऊत यांनी आताच हा मुद्दा का उपस्थित केला असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर विखे म्हणाले, सकाळी उठल्यानंतर मालकाची चाकरी करायची म्हटल्यानंतर मालकाने भाकरी टाकली पाहिजे ना म्हणून त्यांना काहीतरी विषय पाहिजे असतो. त्यांना काय चौकशी करायची ती करू द्या, मी स्वतः ईडीला पत्र द्यायला तयार आहे. याआधी या प्रकरणात सहा ते सात वर्षांपुर्वीच ईडीची चौकशी होऊन गेली आहे. त्यामुळे त्यासाठी मी काही भाजपात आलेलो नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

अधिकाऱ्यांना तंबी देण्याची मंत्री विखे पाटलांवर आली वेळ; वाळू विक्री केंद्रावर नक्की काय झालं?

घोटाळे बहाद्दरांच्या आरोपांना किंमत देत नाही

राज्यात पहिल्यांदाच महसूल खात्याच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आली आहे. सगळ्या बदल्यांना स्थगिती नाही. दोनशे बदल्या होऊन गेल्या आहेत. चार ते पाच बदल्यांना मॅटने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती यासाठी दिली गेली की त्या ठिकाणचे जे तहसीलदार होते त्यांची मुदतपूर्व बदली होत होती. आपल्या काही लोकप्रतिनिधींनी नव्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली होती. म्हणून ती मुदतपूर्व बदली झाल्याने मॅटने त्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे यात घोटाळा झाल्याचा आरोप घोटाळे बहाद्दरांनी करणं आणि त्यावर आम्ही खुलासा करणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने काहीच अर्थ नाही आणि त्यावर काही खुलासा करण्याचीही मला गरज वाटत नाही.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube