Download App

…तर थेट ‘आयटी’तल्या नोकरीला ठोकणार रामराम; नव्या वाहतूक धोरणाची भारतीयांमध्ये चर्चा

  • Written By: Last Updated:

रस्ते अपघात रोखण्यासाठी नव्याने लागू झालेल्या एका वाहतूक धोरणाची करोडो भारतीयांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे तर, काहींनी याचा धसकापण घेतला आहे. हे धोरण जर देशात लागू झाले तर, आम्ही नोकरीलाच रामराम ठोकू असा थेट फतवाच देशवासियांनी जाहीर करून टाकला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे कोणते वाहतूक धोरण आहे ज्यामुळे भारतीय थेट नोकरीलाच रामराम करण्यापर्यंत पोहोचले आहेत चला तर मग याचबद्दल जाणून घेऊया.

काही भारतीयांनी धसका तर, संधीचं सोन्यात रूपांतर करून देणारं हे वाहतूक धोरण आपल्या देशातील नसून, व्हिएतनाम या देशाचे आहे. व्हिएतनामने त्यांच्या देशातील वाहतूक नियमांचे उल्लंघन नियंत्रित करण्यासाठी एक अनोखी रणनीती अवलंबली आहे आणि हीच अनोखी रणनीती  भारतात लागू झाल्यास आम्ही थेट नोकरीलाच रामराम ठोकू असा सूर अनेकांनी आळवला आहे.

झोपता झोपता AI च्या मदतीने 1,000 नोकऱ्यांसाठी अर्ज अन् सकाळी घडलं असं काही …

तक्रार करा अन् हजारो रुपये कमवा

खरं तर, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार किंवा माहिती देणारी व्यक्ती आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 5 मिलियन डोंग म्हणजेच अंदाजे 17,000 हजार रूपये बक्षीस म्हणून मिळवू शकते. या योजनेचा उद्देश रस्ता सुरक्षा वाढवणे आणि वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे असल्याचे या देशाने म्हटले आहे. तर, तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे.

व्हिएतनाममध्ये वाहतुकीचे नियम काय?

बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी 2024 च्या सुरुवातीपासून व्हिएतनाममध्ये मोठ्या दंदाची तरतूद करण्यात आली आहे. यात वाहन चालवताना सिग्लल तोडल्यास किंवा मोबाईलवर बोलल्यास मोटारसायकलस्वारांना ₹20,000 (6 मिलियन डोंग) दंड आहे. तर, कार चालकांसाठी याच नियमांच्या उल्लंघनासाठी ₹70,000 (20 मिलियन डोंग) पर्यंत दंड भरण्याची तरतूद आहे.

भारतीय नागरिक थेट म्हणाले आम्ही नोकरीच सोडू

व्हिएतनामच्या या नव्या कायद्याची भारतात मोठ्या प्रमाणात चर्चे असून, सोशल मीडियावर अनेकांनी या धोरणाचे कौतुक केले आहे, तर एका यूजरने हा कायदा किंवा धोरण भारतात लागू झाल्यास लोक नोकऱ्या सोडून फक्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार करून बक्कळ पैसे कमवतील असे म्हटले आहे. एकूणच काय तर, भारतात दिवसागणिक वाढणाऱ्या रस्ते अपघात आणि वाहतूक नियमांची होणारी पायमल्ली रोखण्यासाठी कठोर दंड आणि शिक्षा यावर वेळोवेळी चर्चे होत असते पण अद्याप यावर नियंत्रण मिळवण्यात तरी यश आलेले नसून, व्हिएतनाम सारखं वाहतूक धोरण आपल्या देशात लागू झाल्यास बक्षीस म्हणून मिळणारी रक्कम बघता आम्ही नोकरीलाच रामराम करू असा थेट निर्णयच भारतीय नेटकऱ्यांनी देऊन टाकला आहे.

follow us