West Central Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आता रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. ती म्हणजे, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) अंतर्गत 3000 हून अधिक अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.
8 Doan 75 Teaser: ‘8 दोन 75′ : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा टिझर रिलीज
भारतीय रेल्वेचा विस्तार लक्षात घेता त्यासाठी कुशल आणि अकुशल कामगारांची गरज आहे. तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांना विशेष मागणी आहे. हे लक्षात घेऊन रेल्वेने तीन हजारांहून अधिक शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कऱण्याची अंतिम तारीख ही १४ जानेवारी आहे. पश्चिम मध्य रेल्वे भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पश्चिम मध्य रेल्वे भरती अंतर्गत एकूण 3015 रिक्त जागा भरल्या जातील.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी, उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेले असावे.
वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – १५ ते २४ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज शुल्क-
खुली/ओबीसी श्रेणी – १३६ रुपये.
मागासवर्गीय/महिला/पीडब्ल्यूडी – रु. ३६.
नोकरीचे ठिकाण – पश्चिम-मध्य रेल्वे.
अधिकृत संकेतस्थळ –
https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – १५ डिसेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १४ जानेवारी २०२४
जाहिरात-
https://drive.google.com/file/d/1K5oFe-hOSfsezYHoy8hnJwP7rqvsmv7B/view
अर्ज कसा करायचा-
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, प्रथम वेबसाइटवर जा.
यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा .
त्यानंतर तुमचा वैयक्तिक तपशील भरा आणि वारपकर्ता आईडी तसेच पासवर्ड तयार करा.
यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचा.
उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज करताना कोणतीही चूक करू नये अन्यथा अर्ज नाकारला जाईल.