LetsUpp | Govt.Schemes
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (Mahatma Phule Backward Class Development Corporation)मर्यादित ‘महाप्रित’ (Mahaprit)च्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकं कोण-कोणत्या योजना राबविण्यात येतात. याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.
Cannes 2023: हरियाणवी गायिका सपना चौधरीच कान्स फेस्टिव्हलमध्ये दिमाखात पदार्पण
ग्रामीण भागात उद्योग सुरु करणे (Starting industries in rural areas), अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, कृषी प्रक्रिया उद्योग(Agro processing industry), सौर प्रकल्प(Solar Project), मुलभूत सुविधा असे पथदर्शी प्रकल्प या महाप्रित’च्या माध्यमातून राबविण्यात येतात. तसेच महाप्रितच्या माध्यमातून आणखी काय-काय योजना राबविल्या जातात. ते आपण ‘महाप्रित’चे कार्यकारी संचालक प्रशांत गेडम (Prashant Gedam)यांच्याकडूनच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं.
महामंडळाचे ध्येय काय आहे?: महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल व दारिद्रय रेषेअंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना आणि सफाई कामगारांच्या आश्रितांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी आर्थिक योजना राबविणे तसेच प्रशिक्षण देणे हे महामंडळाचे ध्येय आहे.
प्रामुख्याने कोणत्या योजना राबविल्या जातात? : अनुसूचित जाती, नवबौद्ध व सफाई कर्मचारी यांच्याकरिता प्रामुख्याने स्वयंरोजगार व प्रशिक्षणाच्या योजना महामंडळामार्फत राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये कर्ज अनुदान योजना, बीज भांडवल योजना, प्रशिक्षण योजना अशा विविध योजनांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे सर्व योजनांचे उद्दीष्टे पूर्ण करण्याबरोबरच जास्तीत जास्त योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचतील यासाठी काम करत आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक दृष्टया दुर्बल असणाऱ्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.